Manoj Jarange Biography : शिक्षण सोडलं, हॉटेलवर काम केलं, सामान्य कार्यकर्ता झाला मराठ्यांचा सरदार, मनोज जरांगेंचा धगधगता प्रवास

Manoj Jarange Patil News Update : मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेले आणि मुंबईवर धडकणारे मराठा नेते जरांगे पाटील कोण आहेत? मुंबईवर मराठा आरक्षणासाठी धडकणाऱ्या मनोज जरांगे बद्दल हे तुम्हाला माहिती आहे का?
MANOJ JARANGE PATIL
Who is Manoj Jarange Patil? The Face of Maratha Reservation Movementsaam TV Marathi News
Published On
Summary
  • मनोज जरांगे पाटील हे मूळ बीडचे असून सध्या जालना येथे स्थायिक आहेत.

  • बारावीनंतर शिक्षण सोडून त्यांनी हॉटेलवर काम केलं.

  • समाजकार्यासाठी स्वतःची जमीन विकली, साधं पत्र्याचं घर आहे.

  • काँग्रेस युवक जिल्हाध्यक्षपद सोडून मराठा आरक्षणासाठी नेतृत्व घेतलं.

  • ३० पेक्षा जास्त आंदोलने केली असून आज ते मराठा आरक्षणाचा आक्रमक चेहरा बनले आहेत.

अक्षय शिंदे पाटील, जालना प्रतिनिधी

WHO IS MANOJ JARANGE PATIL? मराठा आरक्षणासाठी मागील १५ वर्षांपासून मनोज जरांगे पाटील जिवाचे रान करत आहेत. त्यांनी मराठा समाजासाठी जमीनही विकली. काँग्रेसचा युवक जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले, पण ते मराठा आंदोलक झाले कसे? बारावीनंतर शिक्षण सोडलं, उदाहरनिर्वाहासाठी हॉटेलवर काम केलं, समाजकार्यासाठी जमीन विकली, मनोज जारंगे पाटील बाबतीत तुम्हाला माहितीये का? (Who is Manoj Jarange Patil? The Face of Maratha Reservation Movement)

भूमिहीन नेता, समाजकार्यासाठी जमीन विकली... Who is Manoj Jarange Patil Maratha Leader

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हजारो वाहनांच्या ताफ्यासह लाखो मराठ्यांना मुंबईत घेऊन धडक देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्याकडे साधी दुचाकी आणि चारचाकी वाहन नाही. तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही, मात्र हे खर आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेले मनोज जरंगे पाटील यांनी अंतरवाली सराठीतून मुंबईचे दिशेने मोर्चा काढला. 27 ऑगस्टला मनोज जारंगे पाटील अंतरवाली सराटीतून निघाले आणि हजारो वाहनांसह लाखो मराठा बांधव त्यांच्या मोर्चामध्ये सहभागी झाले. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातच नव्हे तर देशभरामध्ये मनोज जरांगे पाटील नाव चर्चेत आलं.

MANOJ JARANGE PATIL
Maratha Aarakshan : महायुतीच्या मंत्र्याचा जरांगेंना जाहीर पाठिंबा, म्हणाले आरक्षण मिळालेच पाहिजे

बीडचे जरांगे जालन्यात कसे आले

मनोज जरांगे पाटील हे मूळ बीड जिल्ह्यातील आहे जवळपास वीस वर्षांपूर्वी त्यांचे वडील जालना जिल्ह्यात स्थायिक झाले. मनोज जारंगे पाटील यांनी बारावीनंतर शिक्षण सोडलं त्यानंतर ते आरक्षणाच्या चळवळीत सामील झाले उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये काम केलं. जरांगे यांनी आतापर्यंत 30 पेक्षा अधिक वेळा आंदोलन केले आहे.... Manoj Jarange Patil education and family details

MANOJ JARANGE PATIL
ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूवर कॅन्सरची सर्जरी, १९ वर्षांपासून देतोय लढा

पत्र्याचं घर,स्वतःकडे वाहन नसणाऱ्या मनोज जरांगेंच्या रॅलीमध्ये हजारो वाहनांचा ताफा... Manoj Jarange Patil struggle story in Marathi

मराठा आरक्षणासाठी मुंबईला निघालेल्या जरांगे पाटलांच्या ताफ्यामध्ये हजारो वाहने चालत आहे.मात्र मनोज जरांगे पाटील यांच्याकडे दुचाकी नाही आणि चारचाकी वाहन देखील नाही हो हे खरं आहे हजारो वाहनांचा ताफा घेऊन जाणाऱ्या जरांगे पाटलांकडे एकही वाहन सध्या नाही. तर जालन्यातील अंकुश नगर येथे जरांगे पाटलांचं पत्र्याचं साधं घर आहे..

MANOJ JARANGE PATIL
Manoj Jarange : मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत दाखल! मनोज जरांगेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन

समाजकार्यासाठी जमीन विकली Manoj Jarange Patil land sold for society work

मनोज जरांगे पाटील हे सामान्य कुटुंबातील आहे त्यांची आर्थिक परिस्थिती हालाखीचीच आहे. 2013 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घरोघरी पोहोचावे म्हणून त्यांनी शंभुराजे या नाटकाचे प्रयोग बीड, जालना अंबड ,शहागड येथे आयोजित केले. जालना येथील प्रयोगा दरम्यान एक हत्ती आणि दोन घोडे दगावले. त्यामुळे जरांगे पाटलांवर केस झाली आणि जरांगे पाटलांना याची भरपाई द्यावी लागली, त्याचबरोबर ज्या ठिकाणी नाटक आयोजित करण्यात आले होते. त्या जिल्हा क्रीडा संकुलाचेही नुकसान झाले, तेव्हा तत्कालीन क्रीडा अधिकारी यांनी नुकसान भरपाईसाठी जरांगे पाटलांना नोटीस बजावली यातून जरांगे पाटलांना जमीन विकावी लागल्याची माहिती आहे.

MANOJ JARANGE PATIL
Manoj Jarange Patil: डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हालायचं नाही, आझाद मैदानावर पोहचताच मनोज जरांगे आक्रमक

काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष ते मराठा नेता Why did Manoj Jarange leave Congress?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेले जरांगे पाटील सध्या चर्चेत आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते होते. ते काही काळ जालना जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे अध्यक्षही होते. मात्र वैचारिक मतभेद असल्यामुळे त्यांनी पक्षाच्या सदस्याचा राजीनामा दिला आणि ते राजकारणातून बाहेर पडले. मराठा समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली आणि या माध्यमातून त्यांनी समाजाचे विविध प्रश्न सोडवण्याचं काम केलं. (Know the inspiring story of Manoj Jarange Patil – from dropping education, working at a hotel, selling land for society, to becoming the fearless voice of Maratha reservation.)

MANOJ JARANGE PATIL
Manoj Jarange Patil: मराठ्यांच्या आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील आहेत तरी कोण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com