ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूवर कॅन्सरची सर्जरी, १९ वर्षांपासून देतोय लढा

Michael Clarke skin cancer surgery update : २००६ मध्ये मायकल क्लार्क यांना पहिल्यांदा स्किन कॅन्सर डिटेक्ट झाला होता. आतापर्यंत मायकल क्लार्क यांची २० वेळा सर्जरी करण्यात आली आहे. त्वचेची नियमित तपासणी करून घ्या आणि सूर्यप्रकाशात काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
Michael Clarke Skin Cancer
Michael Clarke Skin Cancer Michael Clarke
Published On
Summary
  • मायकल क्लार्क यांना २००६ मध्ये स्किन कॅन्सरचे निदान झाले.

  • गेल्या १९ वर्षांपासून ते सतत उपचार घेत आहेत.

  • आतापर्यंत जवळपास २० वेळा त्यांची सर्जरी करण्यात आली आहे.

  • सोशल मीडियावरून त्यांनी जनतेला नियमित तपासणीचे आवाहन केले.

Michael Clarke Skin Cancer : ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याच्यावर पुन्हा स्कीन कॅन्सर झालाय. त्याच्यावर नुकतीच सर्जरी करण्यात आली आहे. २००६ मध्ये मायकल क्लार्क याला पहिल्यांदा कॅन्सर झाल्याचे समजलं होतं. जवळपास २० वर्षांपासून क्लार्क कॅन्सरवर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्जरीनंतर क्लार्कने चाहत्यांना स्कीनबाब आवाहन केलेय. मायकल क्लार्कने आतापर्यंत २० वेळा शरीरावरून स्कीन कॅन्सर हटवालाय.

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू मायकल क्लार्क याला २००६ मध्ये स्किन कॅन्सरबाबत समजलं. त्यानंतर तो लागोपाठ त्यावर उपचार करत आहे. त्याने अनेकदा ऑपरेशन, सर्ज केली पण कॅन्सर मूळापासून काही गेला नाही. क्लार्कने सोशल मीडियावर पोस्ट करत लोकांना जागरूक राहण्याचे आवाहन केलेय.

ऑस्ट्रेलियामध्ये स्किन कॅन्सर खरंच आहे. आज माझ्या नाकातून आणखी एक कॅन्सर काढला गेला. तुमच्या त्वचेची तपासणी नक्की करून घ्या. प्रतिबंध हा उपचारापेक्षा चांगला आहे. यासाठी नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. नशीबाने मला या आजाराबद्दल लवकर समजलं. प्रत्येक वेळी मला शरीरातून काहीतरी काढावे लागते, विशेषतः चेहऱ्यावरून, कारण मी सूर्यप्रकाशात खूप वेळ घालवला आहे. आतापर्यंत माझ्या शरीरातून सुमारे 20 स्किन कॅन्सर काढले गेले आहेत. सुरुवातीला मला भीती वाटायची, पण याचा फायदा असा झाला की मी कमी वयातच याला गांभीर्याने घ्यायला सुरुवात केली. आता मी वर्षातून किमान दोन वेळा तपासणी करून घेतो.
मायकल क्लार्क, ऑस्ट्रेलिया माजी क्रिकेटपटू

२००६ मध्ये स्किन कॅन्सरबाबत समजलं

7News च्या रिपोर्ट्सनुसार, ४४ वर्षाच्या मायकल क्लार्कला २००६ मध्ये पहिल्यांदा स्किन कॅन्सर डिटेक्ट झाला. त्यानंतर २० वेळा त्याने सर्जरी केली. त्यामध्ये वेगवेगळ्या भागातून कॅन्सर काढण्यात आलाय. गेल्यावर्षी मायकल क्लार्क याच्या छातीमधून बेसल सेल कार्सिनोमा या भंयकर कॅन्सरला काढण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com