Sanjay Shirsat : संजय राऊत यांना काही दिवसांनी ठाण्याच्या पागल खान्यात न्यावे लागेल; मंत्री संजय शिरसाठ यांची टीका

Pandharpur Malshiras News : संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी निशाण साधत राऊत याना पागल खाण्यात न्यावे लागणार असल्याची टीका केली आहे
Sanjay Shirsat
Sanjay ShirsatSaam tv
Published On

पंढरपूर : संजय राऊत यांच्यासारखे जेष्ठ नेते काय उखडायचे ते उखडा असे विधान करतात. यांची हेडलाइन झाली पाहिजे. राऊत यांचे हे विधान फस्ट्रेशन मधून आले आहे. काही दिवसांनी या माणसाला ठाण्याच्या पागल खान्यात न्यावे लागेल. असे पोलिस देखील सांगतात; असे विधान राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी माळशिरस येथे केले आहे.

मंत्री संजय शिरसाट हे माजी आमदार राम सातपुते यांच्या घरी कार्यक्रमानिमित्त माळशिरस तालुक्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. याशिवाय त्यांनी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत देखील प्रतिक्रिया दिली आहे. 

Sanjay Shirsat
Amravati Crime : महिला पोलीस हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; प्रेमप्रकरणातून पतीचे कटकारस्थान, दोन 'सुपारी किलर' अटकेत

आव्हाड, चव्हाण यांना हिंदूंमध्ये द्वेष पसरवायचा 

पृथ्वीराज चव्हाण, जितेंद्र आव्हाड या लोकांना हिंदूंमध्ये द्वेष पसरवायचा आहे. पाकिस्तानचे ते गुणगान गाणारे लोक आहेत. हिंदू दहशतवादाच्या नावाखाली इतरांना पोसण्याचा हा सर्व कार्यक्रम आहे. मात्र त्यांच्या हिंदू दहशतवाद किंवा पाकिस्तान दहशतवाद अशा विधानाने आता काहीही फरक पडणार नाही. मुस्लिम आणि दलित मत दूर जातात. यासाठी हा त्यांचा प्रयत्न असल्याचे मंत्री शिरसाठ म्हणाले.

Sanjay Shirsat
Mosambi Price : मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात; झाडाखाली पडतोय फळांचा सडा, दारातही मोठी घसरण

राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लागा अशा सूचना केल्या आहेत. राज ठाकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत. पक्ष वाढीसाठी नेहमी नेते बोलत असतात. कोणत्याही पक्षाच्या अखेरचे समीकरण हे सत्ता असते; असेही यावेळी शिरसाट म्हणाले. तसेच राज आणि उद्धव ठाकरे दोघे एकत्र आले तर ते मजबूत राहतील. आम्हाला कुणाची भांडण लावण्यात इंटरेस्ट नाही. कुणाची भांडण झाल्यावर त्यांची मलई खावी; असाही आमचा इरादा नसल्याचे शिरसाट यांनी स्पष्ट केले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com