Amravati Crime : महिला पोलीस हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा; प्रेमप्रकरणातून पतीचे कटकारस्थान, दोन 'सुपारी किलर' अटकेत

Amravati Crime news : आशा घुले या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या. तर त्यांचे पती एसआरपीएफमध्ये कार्यरत असून एका महिलेसोबत असलेल्या प्रेमप्रकरणातून पत्नीच्या हत्येचा कट रचण्यात आला होता
Amravati Crime
Amravati CrimeSaam tv
Published On

अमर घटारे 
अमरावती
: अमरावतीमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेने अमरावतीमध्ये खळबळ उडाली होती. मात्र प्रेमप्रकरणातून नवऱ्यानेच हा कट रचल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी दोन सुपारी किलरांना अटक केली असून या प्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे.  

अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुकृपा कॉलनीत महिला पोलीस कर्मचारी आशा घुले (वय ३८) यांची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामुळे अमरावती शहरात खळबळ उडाली होती. तर एसआरपीएफमध्ये कार्यरत पती राहुल तायडे यानेच पत्नीच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले. यानंतर पोलिसांनी अधिक तपासाची चक्रे फिरवत दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

Amravati Crime
Patoda News : देवदर्शनासाठी आले असता विपरीत घडले; धबधब्याच्या पाण्यात पोहत असताना एकाचा बुडून मृत्यू

दोघे संशयित पोलिसांच्या ताब्यात
अमरावती पोलिसांनी श्रेयश महल्ले आणि ओम शिकार असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. दरम्यान पोलीस कर्मचारी महिलेच्या पतीनेच आपल्या पत्नीच्या खुनाची सुपारी दिली होती, अशी माहिती त्यांनी पोलिसांनी दिली. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे पोलीस दलातही खळबळ उडाली असून, या हत्येचा उद्देश आणि पतीच्या भूमिकेवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Amravati Crime
Badlapur Water Supply : बदलापुरात ऐन पावसाळ्यात पाणी कपात; आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा राहणार बंद

महिनाभरापासून सुरु होता प्लॅन 
मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचा पती राहुल तायडे याने हत्या घडवून आणण्यासाठी सुपारी दिली होती. यासाठी गेल्या एका महिन्यापासून खुनाची योजना आखली जात होती. राहुलचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध होते. तो तिच्याशी लग्न करण्याचा विचार करत होता. याबाबत पत्नीला माहिती झाल्यानंतर पती- पत्नीमध्ये तीन ते चार वर्षांपासून मतभेद सुरू होते. अपघातामुळे पत्नी काही काळ आईच्या घरी राहत होती. त्याचा फायदा घेत खुनाची घटना घडवण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com