Patoda News : देवदर्शनासाठी आले असता विपरीत घडले; धबधब्याच्या पाण्यात पोहत असताना एकाचा बुडून मृत्यू

Beed Patoda News : श्रावण महिन्यात अनेकजण देवदर्शनासाठी जात असतात त्यानुसार पाटोदा तालुक्यात सौताडा रामेश्वर याठिकाणी दर्शन घेऊन जवळच असलेल्या धबधब्यात पोहण्यासाठी सर्व मित्र उतरले होते
Beed Patoda News
Beed Patoda NewsSaam tv
Published On

योगेश काशीद 
बीड
: श्रावण सोमवार असल्याने भाविक दर्शनासाठी जात आहेत. दरम्यान अशाच पद्धतीने काही मित्र सौताडा रामेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. याठिकाणी असलेल्या धबधबा प्रवाहित असल्याने पाण्यात पोहण्याचा मोह आवरला गेला नाही. यात धबधब्याच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले असताना एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पाटोदा तालुक्यात घडली आहे.  

बीड तालुक्यातील बहादुरपूर येथील शंकर कोळेकर असे बुडून मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान पाटोदा तालुक्यात असलेले श्री क्षेत्र रामेश्वर येथे श्रावण महिन्यामध्ये यात्रा उत्सव सुरू आहे. याठिकाणी महाराष्ट्रभरातील अनेक ठिकाणाहून भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यानुसार रविवारच्या दिवशी दुपारच्या सुमारास बीड तालुक्यातील बहादुरपूर येथील काही युवक आपल्या मोटरसायकल वरती सौताडा रामेश्वर येथे देव दर्शनासाठी आले होते.  

Beed Patoda News
Beed : ऍग्रो मशनरी स्टोअरमधून लांबविल्या इलेक्ट्रिक मोटार; लाखो रुपयांची चोरी उघड, चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

माघारी फिरल्यानंतर पाण्यात बुडाला 

देवदर्शन आटोपल्यानंतर जवळच असलेल्या धबधब्यातुन प्रवाहित होत असलेले ज्या ठिकाणी पाणी पडते. त्या ठिकाणी जाऊन पाण्यामध्ये पोहण्यास सुरुवात केली. पाण्यामध्ये पोहत असताना बऱ्याच अंतरावर गेल्यावर माघारी येत असताना शंकर कोळेकर हा पाण्यामध्ये बुडाला. सौताडा येथील रामकिसन सानप व मित्रांनी पाण्यामध्ये बराच वेळ शोध घेतला. पण तो आढळून आला नाही. त्यानंतर त्यांनी वन खात्यातील काही अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली. 

Beed Patoda News
Sambhajinagar : मोबाईलसाठी हट्ट; आईने नकार दिल्याने मुलाने घेतली डोंगरावरून उडी

काही वेळात बाहेर काढले पण.. 
सदर युवक सापडत नसल्यामुळे पाण्यात टाकण्याचा गळ आणला. यानंतर त्यांनी मृतदेह पाहण्यास सुरुवात केली. अवघ्या काही वेळात त्यांना गळाला लागलेला आढळून आला. बाहेर काढल्यानंतर पाटोदा येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास पीआय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार मच्छिंद्र उबाळे करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com