Cabinet Expansion: तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी अपडेट, भावी मंत्र्यांमध्ये आनंदाची लाट; पालकमंत्रीही बदलले जाणार!

Maharashtra Cabinet Expansion Latest Udates: महायुती सरकारच्या तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
Maharashtra Cabinet expansion Big Updates Eknath shinde devendra fadnavis government latest political news
Maharashtra Cabinet expansion Big Updates Eknath shinde devendra fadnavis government latest political news Saam TV
Published On: 

सूरज सावंत, साम टीव्ही

Maharashtra Cabinet Expansion Latest Udates: अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये शपथविधी घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली. राज्यात शिंदे-फडणवीस आणि अजित पवार सरकार स्थापन झालं. पण, यानंतर दुसरा अंक रंगला तो नाराजी नाट्याचा.

राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांना कोणती खाती द्यावी? यावरून भाजप-शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण झाला. मुंबई आणि दिल्लीतील बैठकांनंतर अखेर खातेवाटप जाहीर झालं. मात्र, यात मोठा वेळ निघून गेल्याने तिसरा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला.

Maharashtra Cabinet expansion Big Updates Eknath shinde devendra fadnavis government latest political news
Nitin Gadkari On Sharad Pawar: नितीन गडकरींची शरद पवारांवर बोचरी टीका; म्हणाले, "शरद पवार म्हणजे..."

पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना महायुती सरकारने तिसरा मंत्रिमंडळाचा विस्तार लांबवणीवर टाकला. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांची निराशा झाली. दरम्यान, आता महायुती सरकारच्या तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

अधिवेशन संपल्यानंतर पहिल्याच आठवड्यात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची अपडेट समोर येताच भावी मंत्र्यांची चांगलीच धाकधूक वाढली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या ४ ऑगस्ट रोजी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सांगता होईल, त्यानंतरच्या पहिल्याच आठवड्यात महायुती सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार पार पडेल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे, मंत्रिमंडळ विस्ताराबरोबरच अनेक जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची सुद्धा अदलाबदल होण्याची दाट शक्यता आहे.

Maharashtra Cabinet expansion Big Updates Eknath shinde devendra fadnavis government latest political news
Manipur Viral Video Case: आमची ओळख उघड करू नका, मणिपूर अत्याचार पीडित महिलाची सुप्रीम कोर्टात धाव

राज्याचे नवनियुक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता खात्रीलायक सूत्रांनी वर्तवली आहे. सध्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी असून त्यांच्याजागी अजित पवार यांना पालकमंत्रीपद दिलं जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

सध्या पुण्याचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदासाठी आग्रही आहेत. मात्र, कोल्हापूरचे पालकमंत्रीपदासाठी नव्याने सरकारमध्ये सहभागी झालेले मंत्री हसन मुश्रीफ हे देखील इच्छुक आहेत. त्यामुळे हा तिढा नेमका कसा सोडवला जाणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.