Nitin Gadkari On Sharad Pawar: नितीन गडकरींची शरद पवारांवर बोचरी टीका; म्हणाले, "शरद पवार म्हणजे..."

Maharashtra Political News: एकिकडे पवार उद्या मोदींची भेट घेणार आहेत तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पवारांवर घणाघाती टीका केली आहे.
Nitin Gadkari
Nitin Gadkari saam tv
Published On

Maharashtra Political News: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सध्या पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे चर्चेत आहेत. एकिकडे पवार उद्या मोदींची भेट घेणार आहेत तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पवारांवर घणाघाती टीका केली आहे. शरद पवारांना जपानी बाहुलीची उपमा गडकरिंनी दिली आहे. (Latest Marathi News)

"शरद पवार (Sharad Pawar) म्हणजे जपानी गुडिया प्रत्येकाला वाटतं की, ती आपल्याकडे बघूनच डोळा मारत आहे", असं नितीन गडकरी म्हणालेत. भाजपच्या नागपूर ग्रामीण युनिटमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी शरद पवारांवर अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते.

Nitin Gadkari
Maharashtra Politics: आगामी निवडणुकांमध्ये अजित पवार कमळाचा प्रचार करणार; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

काय म्हणाले नितीन गडकरी

"शरद पवार म्हणजे जपानी गुडिया. जपानी गुडिया जशी प्रत्येकाकडे बघून डोळा मारते तसचं काहीसं शरद पवार यांचं आहे. कार्यकर्त्याला असचं वाटतं की ते आपल्याकडे बघूनच बोलत आहेत. त्यामुळे कार्यकर्ते झाडून कामाला लागतात. पण त्यानंतर तिकीट मात्र भलत्याच व्यक्तीला मिळतं', अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

नितीन गडकरिंनी शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अशात आता गडकरिंच्या या टीकेवर शरद पवार काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Nitin Gadkari
Maharashtra Political Crisis: मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या दोन्ही सुनावण्या लांबवणीवर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com