Maharashtra Political Crisis: मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या दोन्ही सुनावण्या लांबवणीवर

ठाकरे गटाने दाखल केलेल्या दोन्ही याचिकांवरील उद्या होणाऱ्या सुनावण्या लांबणीवर गेल्या आहेत.
Supreme Court
Supreme Court Saam tv
Published On

प्रमोद जगताप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या दोन याचिकांवरील सुनावण्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. या दोन्ही याचिकांवरील उद्या होणाऱ्या सुनावण्या लांबणीवर गेल्या आहेत. यामुळे ठाकरे गटाला या याचिकेवरील सुनावण्यांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकांवर उद्याही सुनावणी होणार नाही. त्याचबरोबर ठाकरे गटाने दाखल केलेल्या १६ आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणीही लांबणीवर गेली आहे. सुप्रीम कोर्टात उद्या 31 जुलैला सुनावणी होणार होती. मात्र सुप्रीम कोर्टाच्या यादीत हे प्रकरण नाही. त्यामुळे या दोन्ही याचिकांवरील सुनावण्या लांबणीवर गेल्या आहेत.

Supreme Court
Meri Mati Mera Desh Campaign: शहीदांच्या स्मरणार्थ केंद्र सरकार राबवणार नवं अभियान; 'मन की बात' दरम्यान PM मोदींची मोठी घोषणा

सुनील प्रभू यांनी दाखल केली होती याचिका

दरम्यान, ठाकरे गटाने दाखल केलेली 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी लांबणीवर गेली आहे. सुप्रीम कोर्टाने दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले होते. त्यावर उद्या सुनावणी होणार होती. उत्तरात विधानसभा अध्यक्ष कोणता मुद्दा मांडणार होते, ते समजणार होतं. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी ही याचिका दाखल केली होती.

नार्वेकरांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत केलं होतं मोठं भाष्य

शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णय प्रक्रियेला वेग आला आहे. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना ३१ जुलैपर्यंत मुदत दिली होती. शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णयावर राहुल नार्वेकर निर्णय देणार होते. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संविधानातील तरतुदींचे पालन करूनच योग्य निर्णय घेणार, असे म्हटले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com