Maharashtra Politics: आगामी निवडणुकांमध्ये अजित पवार कमळाचा प्रचार करणार; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा

Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar: आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार हे कमळाचा प्रचार करणार असा खळबळजनक दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar
Chandrashekhar Bawankule on Ajit Pawarsaam tv
Published On

Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar: अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी बंड करत युती सरकारमध्ये सामील होण्याचा विर्णय घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून दोन गट तयार झाले आहेत.

एकीकडे अजित पवार गटाकडून शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाजपसोबत येण्यासाठी मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे युतीतील पक्षांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.

Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar
Maharashtra Monsoon 2023: शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी, राज्यात लवकरच पाऊस ब्रेक घेणार; ऑगस्ट महिन्यात काय होणार?

आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) हे कमळाचा प्रचार करणार असा खळबळजनक दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, आपणही शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रचार करू, असंही बावनकुळे यांनी सांगिलतं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे हे पाथरी येथे आले होते. यावेळी त्यांनी पंचायत समिती कॉम्प्लेक्स मधील व्यापाऱ्यांशी भेट घेत संवाद साधला. त्यानंतर ओमकारनगर येथील वॉररूमचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर एका सभेला त्यांनी संबोधित केले. या सभेत त्यांनी हे विधान केलं आहे.

Chandrashekhar Bawankule on Ajit Pawar
PM Modi Pune Visit: मन की बात बंद करो, मणिपूर की बात करो; PM मोदींच्या दौऱ्याआधी पुण्यात झळकले बॅनर्स

काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार कमळाचा प्रचार करतील, आता भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीची महायुती झाली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा 2024 निवडणुकीत अजित पवार हे कमळाचा प्रचार करतील, आम्ही सुद्धा शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रचार करू, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शरद पवार भाजपसोबत येणार का? असा सवाल बावनकुळे यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी सूचक विधान केलं आहे. ते म्हणाले की, शरद पवार भाजप सोबत येणार हे आज सांगणे योग्य होणार नाही. काही काळ थांबा वेगळे चित्र तुम्हाला दिसेल, असं बावनकुळे म्हणाले. त्यांच्या या विधानाने चर्चांना उधाण आलं आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com