सर्वांनाच उत्सुकता लागून असलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन परीक्षेचा निकाल जाहीर केला. यंदा बारावीच्या परीक्षेत राज्यातील एकूण ९३. ३७ विद्यार्थी उतीर्ण झाले. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला. तर मुंबई विभागात सर्वात कमी विद्यार्थी पास झाले.
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातून एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. निकाल नेमका काय लागणार, याची पालकांसह विद्यार्थ्यांची उत्सुकता लागली होती.
यंदाही बारावी परीक्षेच्या निकालात मुलींनीच बाजी मारली. राज्यात ९५.४४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या निकालाची टक्केवारी ९१.६० इतकी आहे. दरम्यान, बारावीची निकालाची ५ मोठी वैशिष्ट्ये समोर आली आहे. ती कोणती जाणून घेऊयात सवित्तर
राज्यातील बारावी परीक्षेचा निकाल ९३.३७ टक्के इतका लागला.
सर्वात जास्त निकाल कोकण विभागाचा ९७.५१ टक्के लागला.
सर्वात कमी निकाल मुंबई विभाग ९१.९५ टक्के लागला आहे.
राज्यात मुलींचा निकाल सर्वाधिक लागला. ९५.४४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या.
मुलींच्या तुलनेत मुलाचा निकाल कमी लागला ९१ .६० टक्के मुले पास झाली.
मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८४ टक्क्यांनी जास्त आहे.
एकूण १५४ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
विज्ञान विभाग निकाल ९७.८२ टक्के, तर कला शाखा निकाल ८५.८८ टक्के लागला.
वाणिज्य विभाग निकाल ९२.१८ टक्के, तर व्यवसाय अभ्यासक्रम ८७.२५ टक्के लागला.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीचा बारावी परीक्षेचा निकाल २.१२ टक्क्यांनी जास्त लागला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.