Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदला आरपीआय आठवले गटाचा पाठिंबा, महायुतीतील वादाच्या ठिणग्या उडणार?

RPI Athawale Group Support To Maharashtra Bandh: बदलापुरात दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे.
Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदला आरपीआय आठवले गटाचा पाठिंबा, महायुतीतील वादाच्या ठिणग्या उडणार?
Maharashtra BandhSaam Tv
Published On

अजय दुधाणे, उल्हासनगर

बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेच्या निषेधार्थ २० ऑगस्टला बदलापूरकरांनी बंदची हाक देत आंदोलन केले. यावेळी रस्तारोको आणि रेलरोको आंदोलन करत आंदोलनकर्त्यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. या घटनेवरून आता राजकारण देखील चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीने या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. २४ ऑगस्ट रोजी म्हणजे शनिवारी महाराष्ट्र बंद असणार आहे. या महाराष्ट्र बंदला आता महायुतीतल्या आरपीआय आठवले गटाने पाठिंबा दिला आहे.

बदलापुरात दोन चिमुकल्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र या बंदला महायुतीकडून टीका होत असताना चक्क महायुतीतील रिपाई आठवले गटाने पाठिंबा दिला आहे. जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांनी या बंदमध्ये सहभागी होत आरपीआय आठवले गट बदलापुरातील घटनेचा तीव्र निषेध करेल असे सांगितलं आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीने हा बंद करण्यापेक्षा सर्व पक्षांनी एकत्र येत या घटनेचा निषेध नोंदवला पाहिजे असे देखील मत त्यांनी व्यक्त केले.

Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदला आरपीआय आठवले गटाचा पाठिंबा, महायुतीतील वादाच्या ठिणग्या उडणार?
Maharashtra Bandh: मोठी बातमी! महाराष्ट्र बंद विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका; गुणरत्न सदावर्ते विरोधकांवर खवळले

बदलापूरमधील एका नामांकित शाळेमध्ये १२ ऑगास्टला सफाई कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार केले. ही घटना १६ ऑगस्टला उघड झाली. या घटनेप्रकरणी आरोपी अक्षय शिंदेविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला अटक केली. या घटनेची नोंद करून घेताना पोलिसांनी दिरंगाई आणि हलगर्जीपणा केला होता. त्यामुळे ४ पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. तर शाळेच्या मख्याध्यापकासह ४ शिक्षकांचे निलंबन करण्यात आले. या घटनेमुळे बदलापूरमध्ये संतापाची लाट आहे.

Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदला आरपीआय आठवले गटाचा पाठिंबा, महायुतीतील वादाच्या ठिणग्या उडणार?
Maharashtra Assembly Election 2024: पुढच्या वारीला पांडुरंगाची महापूजा 'मविआ'चाच मुख्यमंत्री करेल, शरद पवार गटातील नेत्याचं मोठं विधान

बदलापूरमधील घटनेच्या निषेधार्थ २० ऑगस्ट रोजी बदलापूरकरांनी बंदची हाक देत आंदोलन केले. सकाळी सहा वाजल्यापासून शाळेच्या गेटवर बदलापूरकरांनी आंदोलन केले. त्यानंतर संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी शाळेमध्ये घुसून तोडफोड केली. यानंतर आंदोलनकर्त्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर जाऊन आंदोलन केले. रेल्वे रूळावर उतरून त्यांनी तब्बल ९ तास रेलरोको आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना लाठीमार केला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. या घटनेप्रकरणी आतापर्यंत ३१ आंदोलनकर्त्यांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. तर रेलरोको आंदोलन करणाऱ्या ३०० आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदला आरपीआय आठवले गटाचा पाठिंबा, महायुतीतील वादाच्या ठिणग्या उडणार?
Maharashtra Politics : वरळी विधानसभेत यंदा तिहेरी लढत होणार? आदित्य ठाकरेंविरोधात महायुतीचा उमेदवार कोण, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com