

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपची सोशल इंजिनीअरिंग
भाजपच्या सोशल इंजिनीअरिंगची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
भाजपच्या उमेदवाराच्या यादीचे वैशिष्ट्ये जाणून घ्या
गणेश कवडे, साम टीव्ही
राज्यात विधानसपरिषदेच्या १० जागा रिक्त झाल्या आहेत. त्यातील ९ जागांवर निवडणूक होणार आहे. तर एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. भाजपने या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. भाजपने मंगळवारी ५ नव्या चेहर्यांना उमेदवारी दिली. भाजपने काल उमेवादीर जाहीर केल्यानंतर त्यांच्या सोशल इंजिनीअरिंगची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
भाजपने उमेदवार निवडीत प्रादेशिक समतोलासह सामाजिक समीकरणे साधण्याचा प्रयत्न केला आहे. विधानपरिषदेसाठी तीन ओबीसी, एका मराठा आणि एक अनुसूचित जाती तर खुल्या प्रवर्गालाही उमेदवार यादीत स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर ऐनवेळी पक्षात आलेल्या आयारामांना नो एन्ट्री दिली आहे. तसेच वर्षानुवर्षे काम करणाऱ्या निष्ठावंतांचे सभागृहात इन्कमिंग पाहायला मिळत आहे.
विधानपरिषदेत कोणाला उमेदवारी दिली?
सुनील कर्जतकर (खुला प्रवर्ग)
माधवी नाईक, मुंबई (SC)
संजय भेंडे, नागपूर (ओबीसी-कुणबी)
विवेक कोल्हे, अहिल्यानगर (मराठा)
प्रमोद जठार, कोकण (ओबीसी-वैश्यवाणी)
प्रज्ञा सातव (ओबीसी-माळी)
भाजपच्या यादीची वैशिष्ट्ये काय?
विभागनिहाय समतोल
विधानपरिषदेसाठी भाजपने यादीत विभागीय समतोल साधल्याचे दिसत आहे. सुनील कर्जतकर यांच्या रूपाने मराठवाडा, प्रमोद जठार आणि माधवी नाईक यांच्या रूपाने कोकण, सुनील भेंडे यांच्या रूपाने विदर्भ तर विवेक कोल्हे यांच्या रूपाने उत्तर महाराष्ट्राला भाजपने प्रतिनिधित्व दिल्याचं यातून स्पष्ट होते. परंतु विभागीय संतुलनामध्ये मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राचा मात्र नंबर लागू शकलेला नाही.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या यादीतून भाजपने पाचही नव्या चेहऱ्यांना संधी दिल्याचे दिसून येते. यामध्ये कार्यकाळ संपत असलेल्या सर्व चेहऱ्यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे. तसेच संघटनेतील महत्वाच्या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन केल्याचे म्हटले जात आहे. भाजपचे ४ आमदार निवृत्त होणार आहेत. संदीप जोशी, दादाराव केचे, संजय केणेकर, रणजित सिंह मोहिते पाटील अशी या आमदारांची नावे आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.