Mumbai Crime: महानगर गॅसच्या नावाने APK फाईल पाठवून मोबाइल हॅक

Mahanagar Gas APK File Mobile Hacking Scam In Mumbai: महानगर गॅसच्या नावाने बनावट APK फाईल पाठवून मोबाइल हॅक करत लाखोंची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या टोळीचा कांदिवली पोलिसांनी पर्दाफाश केला. गुजरातमधून तिघांना अटक करून 6 लाख 24 हजार 518 रुपये जप्त करण्यात आले.
MAHANAGAR GAS APK SCAM: KANDIVALI POLICE ARREST THREE IN MUMBAI CYBER FRAUD
MAHANAGAR GAS APK SCAM: KANDIVALI POLICE ARREST THREE IN MUMBAI CYBER FRAUDsaam tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

महानगर गॅसचे गॅस रीडिंग अपलोड करण्याच्या नावाखाली नागरिकांना APK फाईल पाठवून त्यांचे मोबाइल हॅक करत बँक खात्यातून लाखो रुपये लाटणाऱ्या टोळीचा कांदिवली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील ओलपाड येथून तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून दोन गुन्ह्यांतील फसवणुकीची 6 लाख 24 हजार 518 रुपयांची रक्कम जप्त केली आहे.

MAHANAGAR GAS APK SCAM: KANDIVALI POLICE ARREST THREE IN MUMBAI CYBER FRAUD
टॉप कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन पक्क म्हणत पालकांना गंडा; पुण्यातील 2 बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 मे 2026 रोजी फिर्यादी बकुल कांतिलाल देसाई यांना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून फोन करण्यात आला. त्यांच्या गॅस रीडिंगचे अपलोड करणे बाकी असल्याचे सांगून त्यांच्या मोबाइलवर महानगर गॅस कंपनीच्या नावाने APK फाईल पाठवण्यात आली. ही फाईल डाउनलोड करण्यास सांगून आरोपींनी फिर्यादींचा मोबाइल हॅक केला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून 2 लाख 7 हजार 401 रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी कांदिवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

MAHANAGAR GAS APK SCAM: KANDIVALI POLICE ARREST THREE IN MUMBAI CYBER FRAUD
Mumbai : तुम्हीही मोबाईलवर येणाऱ्या लिंकवर क्लिक करताय? मुंबईत PSI ला लावला चुना; पाहा काय घडले

याच पद्धतीने 7 मे 2026 रोजी शैलेश जयकिशन परमार यांनाही गॅस रीडिंगसाठी केवळ 12 रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर महानगर गॅसच्या नावाने APK फाईल पाठवून ती डाउनलोड करण्यास सांगितले. फाईल डाउनलोड केल्यानंतर त्यांचा मोबाइल हॅक करून HDFC बँकेच्या बचत खात्यातून 4 लाख 17 हजार 117 रुपयांची फसवणूक करण्यात आली.

MAHANAGAR GAS APK SCAM: KANDIVALI POLICE ARREST THREE IN MUMBAI CYBER FRAUD
Mumbai Crime : कांदिवली MTNL केबल चोरीचा पर्दाफाश, २० लाखांचा मुद्देमाल जप्त, १३ जणांना बेड्या

या दोन्ही गुन्ह्यांचा कांदिवली पोलिस ठाण्याच्या सायबर सेलने तांत्रिक तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपींची ओळख उर्विशकुमार राजेशभाई पटेल, जनिकुमार प्रदीपभाई पटेल आणि अंकितकुमार संजयभाई पटेल अशी निष्पन्न झाली. आरोपींनी बजाज फिनसर्वकडून गोल्ड लोन घेऊन त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केल्याचे तसेच त्यानंतर फिर्यादींच्या खात्यातून ऑनलाइन पैसे वळवून बजाज फिनसर्वचे सोने तारण कर्ज फेडून तारण ठेवलेले सोन्याचे दागिने पुन्हा स्वतःकडे घेतल्याचे तपासात समोर आले. कांदिवली पोलिसांच्या पथकाने गुजरातमधील ओलपाड, जिल्हा सुरत येथे कारवाई करत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींकडून गुन्ह्यातील 6,24,518 रुपयांची फसवणुकीची रक्कम जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास कांदिवली पोलिसांकडून सुरू आहे.

ही कारवाई संदीप घुगे DCP उत्तर परिमंडळ 2, करण सोनकवडे व. पो. नि. कांदिवली, यांच्या मार्गदर्शनाखाली कांदिवली पोलिस ठाण्याच्या शेखर शिंदे पोलीस निरीक्षक(गुन्हे), स्वप्निल घोंगडे पो. नी. (जनसंपर्क), दीपक कादबाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र चव्हाण, प्रमोद वाघ, विक्रम डोंगरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश मळेकर, पो.शि. बाळकृष्ण खाडे, संकेत सावंत, जयश्री तलवारे, योगेश हिरेमठ, स्वप्निल जोगलपुरे, रवींद्र देसले यांच्या तपास पथकाने केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com