महाबळेश्वरच्या पिकनिकचा भयानक शेवट! हायवेवर कारचा चक्काचूर, मावळच्या ४ मित्रांचा जागीच मृत्यू, दोघांची मृत्यूशी झुंज

Mahabaleshwar picnic accident Pune Satara Highway : महाबळेश्वरला पिकनिकसाठी निघालेल्या मावळ आणि तळेगावमधील सहा मित्रांच्या कारचा शिरवळजवळ भीषण अपघात झाला. कार-आयशर ट्रकच्या धडकेत चार तरुणांचा मृत्यू, तर दोघे गंभीर जखमी झाले.
Pune Satara Highway accident Death Toll
Pune Satara Highway accident Death TollSaam TV (AI)
Published On

दिलीप कांबळे, मावळ प्रतिनिधी

Pune Satara Highway accident Death Toll : मुसळधार पावसात महाबळेश्वरला पिकनिकचा आनंद लुटण्यासाठी निघालेल्या ६ मित्रांच्या आनंदावर काळाने भयंकर घाला घातला आहे. पुणे-सातारा महामार्गावरील शिरवळ परिसरात भरधाव वेगातील महागड्या टाटा नेक्सॉन कारचा भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार डिव्हायडर ओलांडून विरुद्ध बाजूने येणाऱ्या आयशर ट्रकला जाऊन धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. या हृदयद्रावक दुर्घटनेत मावळ आणि तळेगाव परिसरातील ४ जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला, तर २ जण गंभीर जखमी झाले आहेत.

वेदांत अर्जुन वारिंगे (१९), सोनलिंग धीरेंद्र ठाकूर (१९), आदित्य बाळासाहेब गरुड (१९) आणि निखिल बाळू राऊत (२०) अशी अपघातात मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत. तर दीक्षित दयानंद पुजारी (२०) आणि मयूर हनुमंत शिंदे (२०) हे दोघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अवघ्या १९ ते २० वर्षे वयाच्या ४ तरुण मित्रांचा असा अचानक मृत्यू झाल्याने मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरात अत्यंत सुन्न करणारे वातावरण झाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Pune Satara Highway accident Death Toll
फ्लॅट मालकांसाठी मोठी बातमी! भाडेकरूने नियम मोडला तर दंड कोणाला भरावा लागणार? सोसायटीचा नियम ऐकून उडेल झोप

पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जाणारी टाटा नेक्सॉन कार शिरवळजवळ आली असता चालकाचे वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळेकार डिव्हायडरला धडकून पलटी झाली. त्यानंतर कार विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊन समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला धडकली.

या अपघातात दीक्षित दयानंद पुजारी (२०) आणि मयूर हनुमंत शिंदे (२०) हे दोघे जखमी झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. महामार्ग पोलिसांकडून मदतकार्य करण्यात आले.

Pune Satara Highway accident Death Toll
भूकंपाने क्षणात होत्याचं नव्हतं केलं; १३० हून अधिक जणांचा मृत्यू, २००० जण बेपत्ता; भीषण दृश्यांनी जग सुन्न

अपघाताची माहिती मिळताच सारोळा येथील महामार्ग पोलीस मदत केंद्राचे अधिकारी आणि अंमलदार तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला करण्यात आली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. दरम्यान, अपघाताबाबत शिरवळ पोलीस ठाण्याकडून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com