Accident : साताऱ्यात मध्यरात्री भयंकर अपघात, महागड्या कारचा चक्काचूर, पुण्यातील ४ मित्रांचा जागीच मृत्यू, २ गंभीर

Pune Satara highway accident today : पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. भरधाव कार दुभाजक ओलांडून आयशर ट्रकला धडकली. या दुर्घटनेत पुण्यातील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी आहेत.
Pune Satara highway car truck accident near Shirwal
Four friends killed in Shirwal highway accidentसाम टीव्ही मराठी
Published On

Pune Satara Highway accident death Toll : पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ मध्यरात्रीच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव वेगातील कारचा ताबा सुटून ती दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या आयशर ट्रकला जोरात धडकली. या भीषण अपघातात मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात शिरवळ येथील हॉटेल शिवालयसमोर पहाटे सुमारे सव्वा एक वाजेच्या सुमारास घडला. मावळ आणि तळेगाव परिसरातील ६ तरुण टाटा नेक्सॉन कारने साताऱ्याच्या दिशेने जात होते. शिरवळ परिसरात आले असता चालकाचा कारवरील ताबा अचानक सुटला. वेगात असलेली ही कार थेट दुभाजक (डिव्हायडर) ओलांडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली आणि समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला अत्यंत वेगाने जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला.

Pune Satara highway car truck accident near Shirwal
Honey Trap : खळबळ! भाजप बड्या नेत्याचा तरुणीसोबतचा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल; दाम्पत्याने रचला भयंकर कट

या अपघातात वेदांत वारिंगे, सोनलिंग ठाकूर, आदित्य गरुड आणि निखिल राऊत अशी जागीच मृत्यू झालेल्या चारही तरुणांची नावे आहेत. तर कारमधील इतर दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Satara highway car truck accident near Shirwal
Palghar Earthquake: मध्यरात्री पालघर भूकंपाने हादरले! तासाभरात भूकंपाचे दोन धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

घटनेची माहिती मिळताच सारोळा महामार्ग पोलीस आणि शिरवळ पोलीस ठाण्याच्या पथकाने त्वरित घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Pune Satara highway car truck accident near Shirwal
Maharashtra Weather : घाटमाथ्यांवर जोरदार पावसाचा ‘येलो अलर्ट’; उर्वरित महाराष्ट्रात श्रावणातील रिमझिम सरी अन् ऊन-सावल्यांचा खेळ

पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक पूर्ववत व सुरळीत केली. या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. एकाच परिसरातील ४ तरुण अपघातात ठार झाल्याने मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com