Maharashtra Politics: सत्ताधारी आमदार तुपाशी, जनता मात्र उपाशी; विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी

Maharashtra Budget session 2024: "सत्ताधारी आमदार तुपाशी, जनता मात्र उपाशी", असे फलक हातात घेऊन महाविकासआघाडीच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली.
Maharashtra Budget session 2024
Maharashtra Budget session 2024Saam TV
Published On

Mahayuti vs Maha Vikas Aghadi Latest News

महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पाचवा दिवस असून विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. परंतु, त्याआधीच विरोधकांनी राज्य सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलन सुरू केलं असून सरकारविरोधात जोरदार घोषणाजी करण्यात आली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maharashtra Budget session 2024
Maratha Aarakshan Challenged: मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका; 10 टक्के आरक्षणाला कुणी दिलं आव्हान?

"सत्ताधारी आमदार तुपाशी, जनता मात्र उपाशी", असे फलक हातात घेऊन महाविकासआघाडीच्या नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प गोरगरीब, सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवा पिढी, मागासवर्गीय या सर्वांचा भ्रमनिरास करणारा आहे, असा आरोपही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. (Latest Marathi News)

अर्थसंकल्पात घोषणांचा सुकाळ शेतकऱ्यांसाठी निधीचा दुष्काळ, अर्थसंकल्पात गोलमाल, कंत्राटदार मालामाल अशा घोषणाही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून देण्यात आल्या. यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते सतेज बंटी पाटील, अभिजित वंजारी, नितीन राऊत उपस्थित होते.

याशिवाय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ) सचिन अहिर, रमेश कोडगावकर, विलास पोतनीस, सुनील शिंदे, आमदार राजन साळवी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गटाचे) आमदार रोहित पवार, आमदार सुनील भुसारा यांची देखील उपस्थिती होती.

शरद पवारांकडून उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं निमंत्रण

एकीकडे महाविकास आघाडीचे नेते सरकारविरोधात आक्रमक होत असताना दुसरीकडे शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीमध्ये जेवणाचं आमंत्रण दिलं आहे.

शनिवारी २ मार्च रोजी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मैदानावर नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती राहणार आहे. म्हणून शरद पवारांनी त्यांचं निवासस्थान असलेल्या गोविंदबागेत भोजनाला बोलावलं आहे.

Maharashtra Budget session 2024
Sambhaji Bhide: मनमाडमध्ये भीमसैनिकांनी अडवली संभाजी भिडेंची गाडी; पोलिसांकडून अनेकांची धरपकड, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com