Maratha Aarakshan Challenged: मराठा आरक्षणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका; 10 टक्के आरक्षणाला कुणी दिलं आव्हान?

Petition Against Maratha Reservation: राज्य सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात आता मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Maratha Aarakshan Challenged: Advocate Jayashree Patil has filed a Petition in the Bombay High Court Against the Maratha Reservation
Maratha Aarakshan Challenged: Advocate Jayashree Patil has filed a Petition in the Bombay High Court Against the Maratha ReservationSaam TV
Published On

Petition Against Maratha Reservation in Mumbai High Court

राज्य सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात आता मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा वाद आता कोर्टात पोहचला आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Aarakshan Challenged: Advocate Jayashree Patil has filed a Petition in the Bombay High Court Against the Maratha Reservation
Sambhaji Bhide: मनमाडमध्ये भीमसैनिकांनी अडवली संभाजी भिडेंची गाडी; पोलिसांकडून अनेकांची धरपकड, पाहा VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, मराठा समाज (Maratha Reservation) हा मागास नसून त्यांना कोणत्याही आरक्षणाची गरज नाही, असं जयश्री पाटील यांनी आपल्या याचिकेतून म्हटलं आहे. त्याचबरोबर निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या नेमणुकीवरही आक्षेप घेण्यात आला आहे. (Latest Marathi News)

मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी सुनील शुक्रे यांची झालेली नेमणूक चुकीची असल्याचं याचिकेत म्हटलं आहे. त्याचबरोबर न्यायमूर्ती दिलीप भोसले यांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांपेक्षाही जास्त मानधन दिलं गेलं, असा दावा देखील याचिकेतून करण्यात आला आहे.

गुरुवारी (ता. २९) हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलं आहे. आरक्षणविरोधी याचिका दाखल झाल्यास आमचं म्हणणं ऐकून घ्या, अशी विनंती विनोद पाटील यांनी हायकोर्टाला केली आहे. त्यामुळे आता लवकरच मराठा आरक्षणाचा लढा हायकोर्टात सुरू होणार आहे.

दुसरीकडे सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे. मराठा समाजाचा ओबीस मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मराठा समाजाला दिलेले १० टक्के आरक्षण ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करा, असं जरांगे यांनी म्हटलं आहे.

Maratha Aarakshan Challenged: Advocate Jayashree Patil has filed a Petition in the Bombay High Court Against the Maratha Reservation
Sanjay Raut: महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, "वंचित बहुजन आघाडीशिवाय..."

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com