Uddhav Thackeray: मातोश्रीच्या खास शिलेदारासाठी उद्धव ठाकरे मैदानात; मुंबईत आज जाहीर सभा घेणार

Shivsena Mumbai Sabha: दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने मातोश्रीचे खास शिलेदार अनिल देसाई यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.
Uddhav Thackeray Anil Desai
Uddhav Thackeray Anil Desai Saam TV

Uddhav Thackeray Mumbai sabha

दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाने मातोश्रीचे खास शिलेदार अनिल देसाई यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यांचा प्रचार करण्यासाठी उद्धव ठाकरे आज स्वत: मैदानात उतरणार आहे. अँटॉप हिल इथल्या भरणी नाका रोडवर संध्याकाळी ६ वाजता उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी शिवसैनिकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

Uddhav Thackeray Anil Desai
Parbhani Lok Sabha: महायुतीच्या उमेदवारांसाठी थेट PM मोदी प्रचाराला; आज नांदेड अन् परभणीत जंगी सभा घेणार

महाविकास आघाडीच्या जागावाटपात दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ  (Lok Sabha Election 2024) हा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला आहे. या ठिकाणाहून ठाकरे गटाने अनिल देसाई यांनी उमेदवारी दिली आहे. यावरुन काँग्रेस पदाधिकारी नाराज झाले होते. त्यांनी देसाई यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली होती.

ही बाब समोर येताच उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दोन दिवसांपूर्वी दक्षिण मध्य इथल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. या बैठकीनंतर काँग्रेससह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांनी अनिल देसाई यांचा जोरदार प्रचार सुरू केला आहे.

आज उद्धव ठाकरे देखील अनिल देसाईंच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहे. त्यामुळे या सभेत ठाकरे नेमकं काय बोलणार? याकडे शिवसैनिकांचं लक्ष लागून आहे. दुसरीकडे महायुतीने अनिल देसाई यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांना उमेदवारी दिली आहे.

राहुल शेवाळे यांनी देखील जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राहुल शेवाळे यांनी त्यांची भेट घेतली आहे. दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात सभा आणि प्रचार कशा प्रकारे सुरू आहे, याची विचारपूस राज ठाकरेंनी शेवाळेंकडे केली आहे.

Uddhav Thackeray Anil Desai
Jalna Lok Sabha: जालन्यात रावसाहेब दानवेंची ताकद वाढली, काँग्रेसला मोठं खिंडार; आजी-माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com