Parbhani Lok Sabha: महायुतीच्या उमेदवारांसाठी थेट PM मोदी प्रचाराला; आज नांदेड अन् परभणीत जंगी सभा घेणार

Narendra Modi Sabha: महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत. आज मोदी नांदेड आणि परभणी लोकसभा मतदारसंघात दोन जंगी सभा घेणार आहेत.
Narendra Modi Parbhani and Nanded Sabha
Narendra Modi Parbhani and Nanded Sabha Saam TV
Published On

Narendra Modi Parbhani and Nanded Sabha

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून पूर्व विदर्भातील ५ जागांसाठी शुक्रवारी (ता. १९) पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलं. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये असलेल्या लोकसभेच्या जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार प्रचार सुरू करण्यात आला आहे. महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदानात उतरले आहेत.

Narendra Modi Parbhani and Nanded Sabha
Jalna Lok Sabha: जालन्यात रावसाहेब दानवेंची ताकद वाढली, काँग्रेसला मोठं खिंडार; आजी-माजी नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ वर्ध्यात टोलेजंग सभा घेतली. या सभेतून त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. आज नरेंद्र मोदी (Narendra Modi) नांदेड आणि परभणी लोकसभा मतदारसंघात दोन जंगी सभा घेणार आहेत.

या सभेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री भागवत कराड आणि महायुतीचे अन्य नेतेही उपस्थित राहणार आहेत. नांदेडमध्ये भाजपचे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याविरोधात महाविकास आघाडीने वसंत चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे.

तर परभणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांच्याविरोधात महायुतीने महादेव जानकर यांना लोकसभेच्या मैदानात (Lok Sabha Election 2024) उतरवलं आहे. महायुतीच्या या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सभा घेणार आहेत. या सभेत ते नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

परभणी लोकसभेचे विद्यमान खासदार हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे असल्याने मोदींनी या मतदारसंघावर विशेष लक्ष दिलं आहे. महादेव जानकर यांना निवडून आणण्याची सर्वस्व जबाबदारी ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी घेतली आहे. नांदेडमध्ये सकाळी १० वाजता मोदींच्या प्रचारसभेला सुरुवात होणार आहे.

या सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी परभणीत जाणार असून दुपारी २ वाजेच्या सुमारास सभा घेणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी महायुतीच्या नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे. सभेत कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी देखील तगडा बंदोबस्त ठेवला आहे. मोदींच्या सुरक्षतेसाठी पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Narendra Modi Parbhani and Nanded Sabha
Hatkanangle Lok Sabha: हातकणंगलेत कोणाला हात, कोणाचा घात? मविआला शेट्टींचा अन् महायुतीला पाटलांचा धसका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com