

फेरीवाल्याकडून केडीएमसी अधिकारी हल्ला प्रकरणी मोठी अपडेट
हल्ल्यात अधिकारी झाले होते जखमी
हल्ल्यानंतर डोंबिवली घरडा सर्कल ते पेंढरकर कॉलेज परिसरातील फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई
संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
डोंबिवली घरडा सर्कल ते पेंढरकर कॉलेज परिसरात केडीएमसीने फेरीवाल्याच्या विरोधात शुक्रवारी कारवाई केली होती. या कारवाईच्या वेळी केडीएमसी अधिकाऱ्यावर बांबूने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर केडीएमसीचे कारवाई पथक आज पु्न्हा सगळा फौजफाटा घेऊन पेंढरकर कॉलेज परिसरातील पोहचले. फेरीवाल्यांच्या विरोधात आज शनिवारी धडक कारवाई करण्यात आली. त्या ठिकाणच्या जवळपास ४० टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
फेरीवाला पथक घरडा सर्कल ते पेंढरकर कॉलेज परिसरात फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाईसाठी पोहचले होते. त्याठिकाणी कारवाईस एका सँडविज विक्रेत्याने तीव्र विरोध केला. अधिकारी सुरेश कामराज यांना बांबूने मारहाण केली. या घनटेत सुरेश जखमी झाले. त्यामुळे काल कारवाई पथकाला कारवाई न करताच माघारी फिरावे लागले होते.
फेरीवाल्यांचा कारवाईस झालेला विरोध पाहता महापालिकेचे उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी आज फेरीवाला हटाव पथकासह सगळा फौजफाटा घेऊन घरडा सर्कल ते पेंढरकर कॉलेज परिसरातील सगळ्या फेरीवाल्यांच्या विरोधात धडक कारवाई केली. आजही फेरीवाल्यांनी कारवाईस विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र आज त्यांचा विरोध कारवाई पथकाने हाणून पाडला.
सगळे फेरीवाले पिटाळून लावण्यात आले. यावेळी काही फेरीवाल्यांनी महापालिकेच्या अधिकारी वर्गावर गंभीर आरोप केले. फेरीवाल्यांकडून महापालिकेच्या कारवाई पथक पैसे उकळत असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र हा आरोप प्रशासनाने फेटाळून लावला. जवळपास ४० टपऱ्यांवर हटविण्याची कारवाई आज करण्यात आली. फेरीवाल्यांनी घरडा सर्कल ते पेंढरकर कॉलेज परिसरात रस्ते अडविले आहेत. त्यामुळे वाहतूकीस अडथळा होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.