Katraj Milk: पुणेकरांच्या खिशाला कात्री! कात्रज डेअरीच्या दुधात २ रुपयांनी वाढ, नवे दर किती?

Katraj Milk Price Hike: कात्रज डेअरीच्या दुधाच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पुणेकरांना कात्रज डेअरीचे दूध खरेदी करताना प्रति लिटर दुधासाठी २ रुपये जास्त मोजावे लागणार आहे.
Katraj Milk: पुणेकरांच्या खिशाला कात्री! कात्रज डेअरीच्या दुधात २ रुपयांनी वाढ, नवे दर किती?
Katraj MilkSaam Tv
Published On

सचिन जाधव, पुणे

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण कात्रज डेअरीचे दूध खरेदी करताना त्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहे. पुण्यातील कात्रज डेअरीकडून दूध विक्री दरात २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कात्रज डेअरीचे दूध खरेदी करताना प्रति लिटर २ रुपये जास्त मोजावे लागणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा दूध संघ म्हणजेच कात्रज डेअरीने दूध विक्री दरात २ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे कात्रज दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फटका बसणार आहे. पुणे जिल्हा दूध संघाच्या खरेदी दरात वाढ झाल्याने तसेच वाहतूक आणि इतर खर्चात वाढ झाल्याने दूध विक्रीदर वाढविणे क्रमप्राप्त झाल्याने सोमवारपासून दूध विक्री दरात प्रति लिटर २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या सहमतीने घेण्यात आला आहे.

Katraj Milk: पुणेकरांच्या खिशाला कात्री! कात्रज डेअरीच्या दुधात २ रुपयांनी वाढ, नवे दर किती?
Pune News: पुण्यात पॅलेस्टिनी पोस्टरवरून तुफान राडा, भररस्त्यात समर्थकांना मारहाण; VIDEO व्हायरल होताच कारवाई

यापूर्वी कात्रज डेअरीने गतवर्षी मार्च महिन्यात प्रतिलिटर २ रुपयांनी दूधविक्री दरात वाढ केली होती. कात्रज डेअरीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची वाढ झाल्यामुळे आता पुणेकरांच्या खिशाला झळ बसणार आहे. उन्हाळ्यामुळे दूध संकलनात घट झाली आहे. दुसरीकडे दुग्धजन्य पदार्थांसाठी दुधाची मागणी वाढली आहे. उन्हाळ्यातील चारा आणि पाणीटंचाईमुळे दूध उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा भाव देण्यासाठी दूध दरवाढ करावी लागली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

नविन दर (प्रति लिटर)

फुल क्रिम मिल्क - आधीचे दर ७२ रुपये. नवे दर ७४ रुपये

प्रमाणित दूध- आधीचे दर ६२ रुपये. नवे दर ६४ रुपये

Katraj Milk: पुणेकरांच्या खिशाला कात्री! कात्रज डेअरीच्या दुधात २ रुपयांनी वाढ, नवे दर किती?
Pune BJP : पुणे मनपा निवडणुकीआधी भाजपने डाव टाकला, शहरअध्यक्ष निवडला, महापालिकेत पुन्हा कमळ फुलणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com