Pune BJP : पुणे मनपा निवडणुकीआधी भाजपने डाव टाकला, शहरअध्यक्ष निवडला, महापालिकेत पुन्हा कमळ फुलणार?

Pune civic elections 2025 : भाजपने पुणे शहराध्यक्षपदी पुन्हा धीरज घाटे यांची नियुक्ती केली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील यशानंतर आता पुणे महापालिकेवर पुन्हा एकदा कमळ फुलवण्याचे मोठे आव्हान त्यांच्या खांद्यावर आहे.
Dheeraj Ghate Reappointed as BJP Pune President
Dheeraj Ghate Reappointed as BJP Pune PresidentSaam TV News
Published On

अक्षय बडवे, पुणे प्रतिनिधी

Dheeraj Ghate Reappointed as BJP Pune President : भारतीय जनता पक्षाने (भाजप) आज राज्यभरातील जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या नियुक्त्यांमध्ये बदल केले. यात पुणे शहराच्या शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी प्रदेश नेत्यांनी बंद लिफाफ्यातून शहराध्यक्षपदासाठी नावे मागवली होती, ज्यात घाटे यांचे नाव आघाडीवर होते.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान घाटे यांनी शहराध्यक्षपद सांभाळले असून, दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला पुण्यात घवघवीत यश मिळाले. त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळे पक्षात त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. यामुळे, "नवा चेहरा की जुनाच विश्वास?" अशी चर्चा असताना, प्रदेश नेतृत्वाने घाटे यांच्यावरच पुन्हा जबाबदारी सोपवली. "जिथे विश्वास, तिथे घाटे" अशी म्हण पक्ष कार्यकर्त्यांमध्ये रूढ झाली आहे. घाटे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरात भाजप आणखी मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Dheeraj Ghate Reappointed as BJP Pune President
Pune heavy rain : दूध का दूध, पाणीच पाणी! पुण्यातल्या १ तासाच्या पावसानं महापालिकेच्या कारभाराची पोलखोल

नेमके कोण आहेत धीरज घाटे

पुण्याच्या सामाजिक क्षेत्रात गेल्या 32 वर्षांपासून धीरजगाटे सक्रिय आहेत. पुणे महापालिकेच्या नगरसेवक पदावर असताना धीरज घाटे यांनी महापालिकेचे सभागृह नेतेपद सुद्धा भूषवला आहे. साने गुरुजी मंडळ व हिंदू गर्जना प्रतिष्ठानच्या माध्यमातून धीरज घाटे यांनी राजकीय तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. शहरातील अनेकांसोबत दांडगा संपर्क असलेली धीरज घाटे हे स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारामधून आलेले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुणे शहराच्या भाजपाचे संघटन मजबूत करण्यासाठी घाटे यांचा वाटा मोठा आहे.

Dheeraj Ghate Reappointed as BJP Pune President
Pune : भयावह! भरचौकात १८ वर्षाच्या तरूणीची हत्या, दुचाकीवर आले अन् सपासप वार केले

पुणे महापालिकेवर कमळ बहरणार, भाजप पदाधिकाऱ्यांच्या प्रतिक्रिया

भाजपकडून आज राज्यातील जिल्हाध्यक्ष आणि शहर अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये पुणे शहरात बदल न करता धीरज घाटे यांनाच पुन्हा शहराध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी काळात भाजपचे पक्ष संघटन आणि सदस्यता नोंदणी यावर भर दिला जाईल आणि पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मोठ्या मताने आम्ही जिंकून येऊ असा विश्वास घाटे यांनी व्यक्त केला. तसंच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत घवघवीत यशानंतर पुणे महापालिकेवर पुन्हा एकदा कमळ च बहरेल अशी प्रतिक्रिया भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. घाटे यांच्या नियुक्तीनंतर कुटुंबाकडून त्यांचे औक्षण करण्यात आले तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांना पेढे भरून त्यांचं अभिनंदन केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com