Pune heavy rain : दूध का दूध, पाणीच पाणी! पुण्यातल्या १ तासाच्या पावसानं महापालिकेच्या कारभाराची पोलखोल

Pune weather alert News : पुण्यात अवघ्या एका तासात मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आणि वाहतूक विस्कळीत झाली. शिवाजीनगर, कोथरूड, बाणेर, हडपसर भागात पाणी साचले. हवामान खात्याने १४-१५ मे साठी यलो अलर्ट जारी केला असून, पुणेकरांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.
Pune heavy rain
Pune heavy rainSaam TV News
Published On

Heavy Rain in Pune Floods Roads : अवकाळी पावसाने पुण्याची आज अवकळा झाली. अवघ्या तासभरच्या मुसळधार पावसाने पुण्याच्या रस्त्यावर आणि पेठामध्ये पाणीच पाणी साचले. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने केलेल्या कामावर आणि दाव्यावर एक प्रकारे प्रश्नचिन्हच उपस्थित राहिलेय. दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा पावसाळाआधीचे कामी पूर्ण झाली नाहीत का? असा सवाल पुणेकरांनी विचारलाय. अवघ्या १ तासाच्या पावसाने पुण्यातील बहुतांश रस्त्यांवर पाणी साचले. पुणे शहरातील रस्त्यावर साठलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली.

पावसामुळे पुणेकरांची दैना Pune monsoon updates, rain in Shivajinagar Pune

पुण्यात सकाळपासूनच आकाश ढगांनी गच्च भरलं होतं, दुपारी पावसानं जोरदार हजेरी लावलीय. "पावसाचा जोर, ओसंडे धरणीचा कोर" म्हणतात ना, तसं शहरात पाण्याचा थैमान सुरू आहे. रस्त्यांवर पाणी साचलं, वाहतूक थांबली, त्यामुळे पुणेकरांचा पावसात पारा चढला होता. पुण्यातील उपनगर यासह मध्यवर्ती भागात पावसाची दमदार एन्ट्री पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून उकडाने हैराण झालेल्या पुणेकरांना हा दिलासा मिळाला मात्र दुसऱ्या बाजूला अचानक आलेल्या पावसाने वाहनचालकांची मात्र तारांबळ उडाली. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुणे शहरात पुढील दोन ते तीन दिवस पावसाच्या सरी बरसणार आहेत.

Pune heavy rain
Pune Unseasonal rain : पुणे चिंब भिजले! शहरासह उपनगरांत जोरदार पाऊस; पुढील २४ तास अलर्ट राहावं लागणार

पुण्याच्या रस्त्यावर पाणीच पाणी Pune municipal corporation rain preparedness,

पुण्यात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासून ढगांनी आकाश व्यापलं, आणि दुपारी शिवाजीनगर, कोथरूड, हडपसर, बाणेर, कात्रज, औंध, पिंपरी-चिंचवड, वाघोलीत सरी कोसळल्या. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि पाण्याचा नाच यामुळे वाहतूक आणि वीजपुरवठा खंडित झाला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रभाव आणि स्थानिक हवामानातील बदल यामुळे हा पाऊस आला. पुण्याचे तापमान ३-४ अंशांनी घसरलं, आणि उकाड्याने हैराण पुणेकरांना दिलासा मिळाला. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस खरीप हंगामाची तयारी करणारा ठरला. पण, साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीला अडथळा झाला.

Pune heavy rain
Unseasonal Rain : राज्याला अवकाळीचा तडाखा! वीज पडून अनर्थ, ६ जणांचा मृत्यू

पुण्याला पुढील दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट IMD yellow alert Pune

भारतीय हवामान विभागाने (IMD) पुण्यात पुढील दोन दिवस, १४ आणि १५ मे २०२५, साठी यलो अलर्ट जारी केला आहे. शहरात मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रभाव आणि स्थानिक हवामान बदलांमुळे हा पाऊस अपेक्षित आहे. काही भागांत वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो. यामुळे वाहतुकीत अडथळे आणि पाणी साचण्याची शक्यता आहे. पुणेकरांना छत्री, रेनकोट सोबत ठेवण्याचा आणि खबरदारी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी हा पाऊस लाभदायक ठरू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com