
८ मे रोजी पुण्यात बी डी एस चळवळीच्या कार्यकर्त्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ पत्रक वाटप केल्यामुळे काही तरुणांनी त्यांना पुण्यातील कर्वेनगर परिसरात मारहाण केली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. बी डी एस (बॉयकॉट, डीवेस्टमेंट, सँक्शन्स) संघटनेचे कार्यकर्ते पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करत असताना त्यांनी काही पाश्चिमात्य खाद्य पदार्थांच्या दुकानाबाहेर सुद्धा ठिय्या मांडला होता. तसेच पॅलेस्टाईन समर्थनार्थ त्यांनी काही पत्रक सुद्धा वाटली.
हे आंदोलन सुरू असल्याची माहिती काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. यावेळी दोन्ही बाजूने बाचाबाची झाली आणि यात आंदोलनाचा विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आंदोलकांना बेदम मारहाण केली. आता याप्रकरणी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बी डी एस संघटनेचे कार्यकर्ते यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पॅलेस्टाईन समर्थकांनी बेकायदेशीररित्या जमाव जमवून सध्या भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये युद्ध सदृश्य परिस्थिती चालू असताना रस्त्याने, फुटपाथवरुन येणाऱ्या- जाणाऱ्या लोकांना अडवून त्यांना आकर्षित करून 'ज्यू लोक निच आहेत त्यांनी पॅलेस्टाईनमधील लोकांच्या कत्तली केलेल्या आहेत. ज्यू लोकांना सर्वांनी वाळीत टाकायला पाहिजे. त्यांचा निषेध केला पाहीजे.', असे म्हणत 'ज्यू' धर्मातील लोकांच्या भावना दुखावतील असे प्रक्षोभकपणे बोलून, ज्यू धर्माविरूध्द आणि इतर धर्मियांमध्ये शत्रुत्व निर्माण होईल अशी व्यक्तव्य केली.
तसंच हमास सारख्या संघटनेच्या विचार, आचारांना खतपाणी घालून त्यांचे समर्थन करणारे पोस्टर्स जनतेत वाटून त्यांच्या विचारांचा प्रचार करून, धार्मिक तेढ निर्माण करून जातीय सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सस्मित राव, कमल शाह, स्वप्नजा लिमकर, ललिता तंगीराला आणि इतर कार्यकर्त्यांवर वारजे पोलिस ठाण्यात कलम भारतीय न्याय संहिता कलम १९६, २९९, ३०२, १८९(२), १९०, १२६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पॅलेस्टाईन समर्थकांनी मारहाण केल्यामुळे स्वप्नजा लिमकर यांनी वारजे पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. फिर्यादी या बी डी एस चळवळीच्या कार्यकर्त्या असून त्यांनी कर्वेनगर परिसरात असणाऱ्या डॉमिनोस पिझ्झाबाहेर पॅलेस्टाईन समर्थनार्थ आंदोलन करत असताना काही जणांनी जमाव करून फिर्यादी यांना शिवीगाळ करत त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण केली. ज्या कार्यकर्त्यांनी पॅलेस्टाईन समर्थकांना मारहाण केली त्यांच्यावर आता गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात महेश पावळे, सागर धामे, अमित जाधव आणि इतर यांच्यावर कलम ७१, १८९(२), १९०, १९१(२), ११५(२), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.