Beed News: पॅलेस्टाईन अन् गाझा पट्टीतील नागरिकांसाठी मदतीच्या नावाखाली लाटला निधी; एटीएसकडून गुन्हा दाखल

Fake NGO Dupes People in Beed: पॅलेस्टाईन आणि गाझा पट्टीतील नागरिकांना मदतीच्या नावाखाली निधी जमा करून स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा आरोप हिमायत फाउंडेशनवर करण्यात आला आहे.
Beed
BeedSaam
Published On

बीड जिल्ह्यातील गेवराई येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पॅलेस्टाईन आणि गाझा पट्टीतील नागरिकांसाठी मदतीच्या नावाखाली जमा करून स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हिमायत फाउंडेशनच्या माध्यमातून सोशल मीडियावरून निधी गोळा करणाऱ्या आरोपीविरोधात एटीएसने गुन्हा नोंदवला आहे.

कुरेशी शाहरुख उर्फ छोटू मिया (रा. राजगली, गेवराई) असे आरोपीचे नाव आहे. त्याने पॅलेस्टाईन आणि गाझा पट्टीतील नागरिकांसाठी मदतीच्या नावाखाली निधी जमा केला. हा निधी त्याने हिमायत फाउंडेशनच्या माध्यमातून सोशल मीडियावरून गोळा केल्याची माहिती तपासातून उघड झाली आहे.

Beed
Crime: खोलीतून ओरडण्याचा आवाज, तरूणी अर्ध नग्न अवस्थेत आढळली; बॉयफ्रेंडने नेमकं काय केलं?

परदेशातील उद्दिष्टांसाठी काम करण्याचा अधिकृत परवाना नसतानाही, हिमायत फाउंडेशन या एनजीओने सोशल मीडियावरून नागरिकांचा विश्वास संपादन केला. तसेच वैयक्तिक बँक खात्यांचा QR कोड वापरून लाखोंचा निधी जमा केला. जमा झालेला निधी स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याने अनेकांची फसवणूक झाल्याचे समोर आले.

Beed
'आमच्या लेकीचा जीव घेतला', विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू, सासरच्यांवर वडिलांचा आरोप | Jalna

देशभरात सध्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांची शोधमोहिम सुरू आहे. अशातच हिमायत फाऊंडेशननेअधिकृत परवाना नसतानाही मदतीच्या नावाखाली निधी जमा करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती उघडकीस झाल्यानंतर, याविरोधात तातडीने कारवाई करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Beed
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो एप्रिल महिन्याचा हप्ता बँकेत जमा झाला का? नसेल तर 'या' ४ पद्धतीने घरबसल्या चेक करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com