Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो एप्रिल महिन्याचा हप्ता बँकेत जमा झाला का? नसेल तर 'या' ४ पद्धतीने घरबसल्या चेक करा

Maharashtras Ladki Bahin Scheme: काही महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले आहेत, तर काहींच्या खात्यात अजून पैसे पोहोचलेले नाहीत. जर तुमच्याही खात्यात अजून रक्कम जमा झाली नसेल, या ४ पद्धतीने तपासा.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरली. या योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत दिली जाते. एप्रिल महिन्याचा हप्त्याची प्रतिक्षा महिला आतुरतेनं करत होत्या. पण एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात काही जमा झाला नाही. पण मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्याच एप्रिल महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

काहींच्या बँक खात्यात खटाखट १५०० रूपये जमा होण्यास सुरूवात झाली. तर, काहींना अद्याप पैसे मिळालेले नाहीत. जर, आपल्याही बँक खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल, बँक खात्यात एकदा चेक करून पाहा. पण आपल्या बँक खात्यात पैसे आले की नाही, हे कसे चेक करावे? यासाठी अगदी सोप्या पद्धतीने चेक करून पाहा.

Ladki Bahin Yojana
Shirdi Bomb Threat: पाईप बॉम्बने उडवून देऊ अन्..; शिर्डीतील साईंच्या संस्थानला धमकीचा मेल, शिर्डीत खळबळ

बँक खात्यात पैसे जमा झाले की नाही, कसं तपासाल?

१. आपल्या बँक खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला की नाही, हे तपासण्यासाठी आपण आपल्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून, बँकेत जमा झालेली रक्कम विचारू शकता.

२. ऑनलाइन बँकिंग किंवा बँकेच्या अॅपद्वारे आपण पासबूक डाऊनलोड करून बँकेत पैसे जमा झाले की नाही, हे पाहू शकता.

Ladki Bahin Yojana
Royal Enfield Bullet १९८६ मध्ये किती रूपयांना होती? बिल पाहून धक्का बसेल | Viral

३. लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्यावर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर मेसेज येईल, बँक खात्यात पैसे जमा झाले की नाही, हे मेसेजद्वारे पाहू शकता.

४. जर आपण ऑनलाइन अॅपचा वापर करत नसाल तर, आपण प्रत्यक्ष बँकेत जाऊन बँक खात्यात पैसे जमा झाले की नाही, हे तपासू शकता.

Ladki Bahin Yojana
CRPF Jawan: व्हिडिओ कॉलद्वारे पाकिस्तानी महिलेशी गुपचूप लग्न, भारतीय जवानाला सेवेतून तातडीने बडतर्फ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com