CRPF Jawan: व्हिडिओ कॉलद्वारे पाकिस्तानी महिलेशी गुपचूप लग्न, भारतीय जवानाला सेवेतून तातडीने बडतर्फ

Indian Soldier Fired for Hiding Marriage to Pakistani Woman: केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) कॉन्स्टेबल मुनीर अहमद यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
CRPF
CRPFSaam
Published On

केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) कॉन्स्टेबल मुनीर अहमद यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. मुनीर अहमद यांनी पाकिस्तानी महिलेशी औपचारिक परवानगीशिवाय विवाह केला होता आणि व्हिसाची मुदत संपल्यानंतरही तिला भारतात ठेवले होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्यांनी ही माहिती आपल्या विभागापासून लपवून ठेवली होती, ज्यामुळे सीआरपीएफने त्यांच्यावर कठोर कारवाई केली आहे.

सीआरपीएफच्या अंतर्गत तपासणीत असे आढळून आले की, मुनीर अहमद यांनी पाकिस्तानी महिलेसोबत व्हिडिओ कॉलद्वारे निकाह केला होता. मुनीर यांनी आपलं लग्न विभागापासून लपवून ठेवलं होतं. तसेच पाकिस्तानी महिला त्यांच्यासोबत दीर्घकाळ राहत असल्याची माहितीही त्यांनी दिली नाही.

CRPF
'...तर, खातं बंद केलं तरी चालेल', लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवल्यानं मंत्री संजय शिरसाटांचा संताप

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जवान मुनीर अहमद यांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. यामुळे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असं अधिकारी म्हणाले. सीआरपीएफ अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्यने घेतले असून, त्यांनी विलंब न करता बडतर्फाची कारवाई केली आहे.

सीआरपीएफ जवानांनी स्पष्ट केले की, सेवा दलात कोणत्याही कर्मचाऱ्याने सेवा अटींचे प्राणिकपणे पालन करणे अपेक्षित आहे. विशेषत: जेव्हा प्रकरण राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असेल.

CRPF
Jalgaon: मासिक पाळीत स्वंयपाक, सासू-नणंदेकडून बेदम मारहाण अन् गळा दाबून हत्या; जळगावमध्ये खळबळ

२४ मे रोजी व्हिडिओ कॉलद्वारे निकाह पार पडला

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगितले होते. याच दरम्यान, अहमदने मीनलसोबत लग्न केलेलं उघड झालं. दोघांचा गेल्या वर्षी व्हिडिओ कॉलद्वारे निकाह पार पडला होता. सीआरपीएफच्या तपासात असे आढळून आले की, जवानाने संबंधित अधिकाऱ्यांना त्याच्या लग्नाबद्दल आणि भारतात पत्नीसोबत राहण्याबद्दल माहिती दिली नव्हती.

CRPF
बांधकाम मजुराची धारदार शस्त्राने हत्या, मृतदेह तिथेच फेकून दिला अन्.. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड | Nagpur

भारतात १० दिवस राहण्याची परवानगी

मिनलला पुन्हा पाकिस्तानला घालवण्यासाठी अटारी वाघा सीमेवर पाठवण्यात आले होते. परंतू, २९ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. न्यायालयाने तिला १० दिवस भारतात राहण्याची परवानगी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com