'...तर, खातं बंद केलं तरी चालेल', लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवल्यानं मंत्री संजय शिरसाटांचा संताप

Minister Sanjay Shirsath on Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी इतर खात्यांचा निधी वळवला; मंत्री संजय शिरसाट यांनी संताप केला व्यक्त, म्हणाले..
Sanjay Shirsat
Sanjay Shirsatgoogle
Published On

राज्यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा १५०० रूपयांचा हप्ता जमा होण्यास सुरूवात झाली. मात्र, या योजनेसाठी निधी मिळवताना चांगलीच दमछाक होत असल्याचं समोर आलं. लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याचा निधी वळवण्यात आला. दोन्ही विभागांचे ४१० कोटी ३० लाख आणि ३३५ कोटी ७० लाख रूपये मिळून महिला आणि बालविकास विभागाच्या खात्यात वळवण्यात आला. या निर्णयानंतर सामाजिक आणि आदिवासी विकास खात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला.

...तर, खाते बंद केले तरी चालेल

निधी वळवल्याच्या मुद्द्यावर संजय शिरसाट म्हणाले, 'खरंतर तुमच्या माध्यमातून या संदर्भातील माहिती मिळाली, जवळपास सव्वाचारशे कोटी वर्ग करण्यात आले, याची कल्पना नव्हती. जर सामाजिक खात्याची आवश्यकता नसेल तर, खाते बंद केले तरी चालेल', असं म्हणत मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केला.

Sanjay Shirsat
बांधकाम मजुराची धारदार शस्त्राने हत्या, मृतदेह तिथेच फेकून दिला अन्.. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड | Nagpur

मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेल

'मला खरंतर याची काहीच कल्पना नव्हती, यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करेन. फायनान्स डिपार्टमेंटची मनमानी चालू आहे. आपण जे काही म्हणू तेच खरं असं सुरू आहे. माझ्या खात्याचा निधी इतर ठिकाणी परस्पर वर्ग करता येत नाही, हा खरंतर नियम आहे. माझं मागच्या वर्षीचं दायित्व १५०० कोटी रूपयांचे आहे. माझं देणे वाढत आहे', असं शिरसाट म्हणाले.

खात्याचा निधी इतर ठिकाणी वर्ग करता येत नाही

'माझ्या खात्याचा कोणताही निधी वर्ग करता येत नाही,हा कायदा आहे. फायनान्स येथे काही हुशार लोक बसले आहेत. त्यांना असे वाटत की निधी वळवता येते. कायद्यात पळवापळवी करून निधी घेणे चुकीचे आहे, असं रोष व्यक्त करत शिरसाटांनी निधी वळवणे चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.

'हे पैसे दलीत भगिनींना दिले असे म्हणता येत नाही. फायनान्समध्ये बसलेले शकुनी लोक आहेत, असं म्हणत शिरसाट यांनी संताप व्यक्त केला.

Sanjay Shirsat
Mumbai Local : रविवारी मुंबईकरांचा प्रवासाचा खोळंबा, लोकल मोटरमन संपाच्या तयारीत | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com