Nashik Crime : आमची बदनामी केली; अपंग तरुणाचं अपहरण, खोलीत डांबून गावगुंडांकडून बेदम मारहाण, नाशिकमधील VIDEO व्हायरल

Nashik Crime News : नाशिकच्या चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथे गावगुंडाच्या टोळीने हैदोस घालत किरकोळ कारणावरून एका अपंग तरुणाचं अपहरण केलं. त्यानंतर त्याला एका खोलीत पट्टा, दांडक्यानं बेदम मारहाण केली.
disabled youth kidnapped and brutally beaten video viral
disabled youth kidnapped and brutally beaten video viral Saam Tv News
Published On

नाशिक : नाशिकच्या चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही येथे गावगुंडाच्या टोळीने हैदोस घालत किरकोळ कारणावरून एका अपंग तरुणाचं अपहरण केलं. त्यानंतर त्याला एका खोलीत पट्टा, दांडक्यानं बेदम मारहाण केली. 'आमची बदनामी केली' असं कारण सांगत या तरुणाला जबर मारहाण करण्यात आली असून मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. चांदवड पोलिसांनी त्याची दखल घेत एका आरोपीला ताब्यात घेऊन मारहाण करणाऱ्या सर्व तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात तरुणीची निर्घृण हत्या

दरम्यान, पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये काल एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिंपरी-चिंचवडला रात्री एका अल्पवयीन तरुणीची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पिंपरी-चिंचवडच्या वाल्हेकर वाडीत थरारक घटना घडली. तरुणीच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. तरुणीची हत्या करणाऱ्या आरोपींचा सीसीटीव्ही समोर आला आहे.

disabled youth kidnapped and brutally beaten video viral
Maharashtra Weather : मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMDचा अंदाज काय सांगतो?

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडच्या वाल्हेकर वाडीत मामा भाच्यांनी मिळून कोमल जाधव नावाच्या अल्पवयीन तरुणीची चाकूने भोसकून हत्या केली. तरुणीची हत्या करणाऱ्या मामा-भाच्याचा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. उदयभान यादव आणि अभिषेक यादव (भाचा) असे दोघांचे नावे आहेत. तरुणीच्या हत्येनंतर अवघ्या काही तासांत पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या.

आरोपी उदयभान हा अल्पवयीन तरुणी कोमल जाधव हिच्या घरासमोरच राहायला होता. उदयनभान आणि कोमलमध्ये आर्थिक संबंध होते. आर्थिक वादातून उदयनभान यादव याने भाचा अभिषेक यादवच्या मदतीने रात्री कोमल जाधव हिच्यावर चाकूने वार करून हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

disabled youth kidnapped and brutally beaten video viral
Buldhana : ट्रक आणि कारचा भयंकर अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, चौघे गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com