Pune Crime : लहान भावाने मोठ्या भावाचा जीव घेतला, प्रत्यक्षदर्शी आईने हात उंचावले, मात्र बायकोच्या जबाबाने पुण्यातील केस फिरली

Pune Crime News : नीलेश बचन बोरकर (वय २७, रा. कोडे वस्ती, उरुळी देवाची) असं शिक्षा झालेल्या दोषीचं नाव आहे. भाऊ मंगेश बोरकर याचा खून केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
 Pune Crime News
Pune Crime NewsSaam Tv News
Published On

पुणे : दारू पिऊन आई-वडिलांना त्रास देत असल्याच्या कारणावरून बेरोजगार असलेल्या मोठ्या भावाच्या डोक्यात दगडी पाटा घालून त्याची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी तरुणाला पुणे कोर्टाने जन्मठेप आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या हत्येची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि तक्रारदार असलेल्या आईने खटल्याच्या सुनावणीत आपली साक्ष फिरवली. मात्र, हत्येच्यावेळी घटनास्थळी असलेल्या आरोपीच्या पत्नीला कोर्टातील पैरवी महिला पोलिस अधिकाऱ्यांनी शोधून न्यायालयात हजर केलं. तिने आरोपी पतीविरोधात दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली अन् अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या कोर्टाने आरोपीला दोषी ठरवलं.

नीलेश बचन बोरकर (वय २७, रा. कोडे वस्ती, उरुळी देवाची) असं शिक्षा झालेल्या दोषीचं नाव आहे. भाऊ मंगेश बोरकर याचा खून केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली होती. ही घटना १९ जानेवारी २०२० रोजी घडली होती. सहायक निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी आरोपीविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं.

 Pune Crime News
Maharashtra Weather : मुंबईमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; IMDचा अंदाज काय सांगतो?

या खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील नामदेव तरळगड्डी यांनी काम पाहिलं. त्यांनी सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासले. या घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या आईने आरोपी मुलाविरोधात साक्ष देण्यास नकार दिला. मात्र, त्यांच्या तक्रारीत आरोपीची पत्नी खुनाच्या घटनेवेळी घरी हजर असल्याचं नमूद होतं; परंतु तपास अधिकाऱ्याने तिचा जबाब नोंदवला नव्हता. हत्येच्या घटनेनंतर ती सोलापुरात आपल्या आईच्या घरी राहत होती. तिची साक्ष नोंदवण्यासाठी तिला कोर्टात हजर करण्यासाठी सरकारी वकील नामदेव तरळगट्टी यांनी कोर्टात अर्ज केला. तर कोर्टातील पैरवी पोलिस अधिकारी ललिता कानवडे यांनी आरोपी नीलेशविरोधात दाखल गुन्ह्यांची माहिती गोळा केली.

त्यात आरोपीने त्याची पत्नी अल्पवयीन असताना तिच्याशी पळून जाऊन लग्न केल्याचं आढळलं. त्यामुळे तिच्या आईने आरोपीविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्या कागदपत्रांच्या आधारे पैरवी अधिकारी ललिता कानवडे यांनी आरोपीच्या पत्नीला सोलापुरातून शोधून न्यायालयात हजर केलं. आरोपीच्या पत्नीने निर्भीडपणे पतीविरोधात साक्ष दिली. त्यामुळे आरोपीच्या आईने साक्ष फिरवली असली, तरी तिने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीला पुष्टी मिळाली. त्या जोरावर सरकारी वकिलांच्या युक्तिवादाच्या आधारे कोर्टाने आरोपीला शिक्षा सुनावली.

 Pune Crime News
Buldhana : ट्रक आणि कारचा भयंकर अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, चौघे गंभीर जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com