Kangana Ranaut and Javed Akhtar : कंगना- जावेद अख्तर यांच्या वादाला पूर्णविराम; दुर्मिळ फोटो शेअर करून दिली माहिती

Kangana Ranaut News: अभिनेत्री कंगना रणौत आणि गीतकार जावेद अख्तर यांच्यातील वाद मिटला असून याबाबत खुद्द कंगना यांनीच खुलासा केला आहे.
Kangana Ranaut and Javed Akhtar
Kangana Ranaut and Javed AkhtarSaam Tv
Published On

मुंबई: अभिनेत्री कंगना रणौत आणि ज्येष्ठ संगीतकार जावेद अख्तर यांच्यातील न्यायालयीन संघर्षाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दोघांमधील वाद मिटल्याचा पुरावाच स्वतः कंगना यांनी दिला आहे. सोशल मीडियावर त्यांनी हा फोटो शेअर करून ही माहिती दिली आहे.

Kangana Ranaut and Javed Akhtar
Akshay Kumar on Madhoo: तू रात्री फ्रीजमध्ये झोपतेस का...? ५५ वर्षांच्या मधुचं सौंदर्यपाहून अक्षय कुमार झाला थक्क

अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत नेहमीच काहीना काही कारणाने चर्चेत असतात. अनेकदा तर रोखठोक वक्तव्यांमुळं शाब्दिक वादही झाले आहेत. सोशल मीडियावर देखील बऱ्याचदा ट्रोल होतात. मागच्या 5 वर्षांपासून कंगना रणौत आणि ज्येष्ठ संगीतकार जावेद अख्तर यांच्यामध्ये न्यायालयीन लढाई सुरू होती. आता ही लढाई संपली आहे. न्यायालयीन संघर्ष संपल्याचे जाहीर करतानाच कंगना यांनी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली. ती स्टोरी बघताच सर्वच थक्क झाले. कंगना यांनी जावेद यांच्यासोबत एक खास फोटो पोस्ट करून दोघांमधला जो वाद होता तो आता निवळला आहे, असे अधोरेखित केले आहे.

Kangana Ranaut and Javed Akhtar
Kiara Advani Pregnant: कियारा-सिद्धार्थच्या घरी येणार नवा पाहुणा; क्यूट स्टाईलमध्ये दिली गुड न्यूज

कंगनांच्या पोस्टमध्ये काय?

कंगना यांनी इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करून एक कॅप्शन लिहिली आहे. जावेद यांच्याविरुद्धचे न्यायालयात जे प्रकरण प्रविष्ठ होते ते आता आम्ही थांबवले आहे. आता आमच्यात कुठलीही न्यायालयीन लढाई राहिली नाही. गीतकार जावेद साहेब खूप दयाळू आणि उदार मनाचे आहेत. तसेच मी जो आगामी सिनेमा दिग्दर्शित करणार आहे, त्यासाठी ते गाणं लिहिणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी होकारही दिला आहे.

Kangana Ranaut and Javed Akhtar
Datta Gade : दत्तात्रय रोज रात्री पुण्यात सावज शोधायचा, मुसक्या आवळल्यानंतर कारमध्ये दत्ता पोपटासारखा बोलला...

कंगना आणि जावेद अख्तर यांच्यातला वाद नेमका काय?

कंगना आणि ऋतिक रोशन यांच्यातील वाद चांगलाच गाजला होता. त्यावेळेस जावेद अख्तर यांनी एक मीटिंग बोलावून कंगना यांना ऋतिकची माफी मागायला सांगितली होती. तसेच जावेद यांनी मला माफी मागण्यासाठी दबाव टाकला होता, असा आरोप कंगना यांनी केला होता. त्यानंतर जावेद यांनी कंगना यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. पण कंगना या एकाही सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाल्या नव्हत्या. न्यायालयाने कंगना यांना शेवटची संधी दिली होती. तरी देखील त्या उपस्थित राहिल्या नाहीत. त्यांच्याविरोधात आजामीनपत्र वॉरंटही जारी करण्यात आले होते. परंतु आता या दोघांमधील न्यायालयीन संघर्ष कायमचा मिटला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com