Sajjan Kumar Verdict: काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमारांना जन्मठेप; १९८४ च्या दंगलीत बापलेकाला जिवंत जाळल्याप्रकरणी शिक्षा

Sajjan Kumar 1984 Sikh Riots Case : 1984 च्या शीख विरोधी दंगल प्रकरणात काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय.
Sajjan Kumar
Sajjan Kumar 1984 Sikh Riots Casegoogle
Published On

1984 च्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी दोषी ठरलेले काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांना आज न्यायालयाने शिक्षा सुनावलीय. राऊस एव्हेन्यू कोर्टाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सज्जन कुमार आधीच दिल्ली कँट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.

1 नोव्हेंबर 1984 रोजी दिल्लीतील सरस्वती विहार भागात जसवंत सिंग आणि त्यांचा मुलगा तरुणदीप सिंग या दोन शीखांच्या निर्घृण हत्येप्रकरणी न्यायालयाने सज्जन कुमार यांना आज शिक्षा सुनावली. दिल्ली पोलिस आणि पीडितांनी हे प्रकरण रेयरेस्ट ऑफ रेयर श्रेणीतील मानून सज्जन कुमारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.

Sajjan Kumar
Deoria Wedding Cancel: लग्नविधी चालू असताना नवरीला आला फोन; नंतर नवरदेवाला आलं टेन्शन

मात्र न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालापूर्वी सज्जन कुमार यांनी शिक्षेत सौम्यता करण्यात यावी असं आवाहन केले होतं. या प्रकरणात मला फाशीची शिक्षा देण्यास कोणताही आधार नसल्याचे त्यांनी आपल्या युक्तिवादात म्हटलं. “मी 80 वर्षांचा झालो आहे. वाढत्या वयाबरोबर मी अनेक आजारांशी झुंजत आहे. मी 2018 पासून तुरुंगात आहे. तेव्हापासून मला कोणतीही पॅरोल मिळालेली नाही, सज्जन कुमार आपल्या युक्तीवादावेळी म्हणाले .

Sajjan Kumar
PM kisan samman yojana : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! PM किसान योजनेचा १९ वा हप्ता जमा; तुम्हाला २००० रुपये मिळाले का?

"1984 च्या दंगलीनंतर कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात माझा सहभाग नव्हता." तुरुंगात/चाचणी दरम्यान माझी वागणूक नेहमीच चांगली होती/माझ्याविरुद्ध कोणतीही तक्रार आली नाही. त्यामुळे माझ्यात सुधारणा झाली नाही असं म्हणता येणार नाही, असंही सज्जन कुमार म्हणालेत. मी तीनदा खासदार राहिलोय.

Sajjan Kumar
India Politics : विधानसभा अधिवेशनाआधीच मोठा राजकीय भूकंप होणार; पंजाबमध्ये आपचे ३२ आमदार फुटण्याची शक्यता

सामाजिक कल्याणासाठी अनेक प्रकल्पांचा एक भाग होतो. मी अजूनही स्वतःला निर्दोष समजतो. न्यायालयाने मानवतावादी पैलू लक्षात घेऊन या प्रकरणात त्याच्यासाठी किमान शिक्षेचा निर्णय घ्यावा, अशी विनंती सज्जन कुमार यांनी युक्तीवादात केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com