आमदारांच्या पाहणी दौऱ्यात सुपरवायझरला मारहाण; भाजप नेत्यासह चौघांवर गुन्हा दाखल; राज्यात खळबळ

Kalyan Umbarde Dumping Ground Supervisor Assault Case Latest News: कल्याणच्या उंबर्डे डम्पिंग ग्राउंडवरील सुपरवायझर मारहाण प्रकरणी खडकपाडा पोलिसांत चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भाजप पदाधिकारी विजय जोशी यांचाही आरोपींमध्ये समावेश असून, पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे
UMBARDE DUMPING GROUND ASSAULT CASE, BJP LEADER VIJAY JOSHI NAMED
UMBARDE DUMPING GROUND ASSAULT CASE, BJP LEADER VIJAY JOSHI NAMEDsaam tv
Published On: 

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण पश्चिमेतील उंबर्डे डम्पिंग ग्राउंड येथे पाहणी दौऱ्यादरम्यान सुपरवायझरला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुपरवायझर किरण रसाळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजय जोशी यांच्यासह तिघांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे कल्याणच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

UMBARDE DUMPING GROUND ASSAULT CASE, BJP LEADER VIJAY JOSHI NAMED
Nalasopara : नालासोपाऱ्यात धक्कादायक प्रकार! अल्पवयीन मुलीची प्रसूती, दुसऱ्या दिवशी ४० हजारांना विकले बाळ

भाजप आमदार सुलभा गायकवाड यांनी उंबर्डे डम्पिंग ग्राउंडची पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान डम्पिंग ग्राउंडवरील कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्रे नसणे, आवश्यक सुरक्षा साधनांचा अभाव, तसेच कचरा वेचण्याच्या कामात बालकांचा समावेश असल्याचे आरोप समोर आले होते. याशिवाय डम्पिंग ग्राउंडमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांच्या आवश्यक कागदपत्रांबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

UMBARDE DUMPING GROUND ASSAULT CASE, BJP LEADER VIJAY JOSHI NAMED
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून गूड न्यूज! ५ हजार रुपये मदतीसह कर्जमाफीबाबत महत्त्वाचे ८ मोठे निर्णय

या पाहणीवेळी सुपरवायझर किरण रसाळ यांनी मद्यप्राशन केल्याचा आरोप भाजप पदाधिकारी विजय जोशी यांनी केला. याच आरोपावरून जोशी यांनी रसाळ यांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, आमदार सुलभा गायकवाड आणि केडीएमसीचे उपायुक्त डॉ. रामदास कोकरे यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला होता. या घटनेनंतर डम्पिंग ग्राउंडवरील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते. परिणामी, कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याने कचरा व्यवस्थापनावरही परिणाम झाला होता.

UMBARDE DUMPING GROUND ASSAULT CASE, BJP LEADER VIJAY JOSHI NAMED
MPSC मध्ये तुकाराम मुंढेंनंतर आणखी एका IAS अधिकाऱ्याची एन्ट्री, कुणाकडे दिली सचिवपदाची सूत्रे?

या प्रकरणी कल्याण काँग्रेसनेही आक्रमक भूमिका घेतली होती. मारहाण करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याविरोधात तातडीने कारवाई करून अटक करण्याची मागणी काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांनी केली होती. यासंदर्भात महापालिका आयुक्तांकडे कारवाईची मागणी करत, कारवाई न झाल्यास काँग्रेस रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला होता. आता या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाल्याने पुढील पोलीस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डम्पिंग ग्राउंडवरील कथित अनियमितता, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि सुपरवायझरला मारहाण केल्याच्या आरोपांची चौकशी करून प्रशासन आणि पोलीस पुढे काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com