Kalyan Traffic: कल्याणमध्ये वाहतुकीत मोठे बदल, १० दिवस ७ मार्गावर प्रवेशबंदी; पर्यायी मार्ग कोणते?

Kalyan Traffic Changes: कल्याणमध्ये नवरात्रोत्सवात वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत. १० दिवस ७ मार्गावर अवजड वाहने आणि बसेसला प्रवेशबंदी असणार आहे.
Kalyan Traffic: कल्याणमध्ये वाहतुकीत मोठे बदल, १० दिवस ७ मार्गावर प्रवेशबंदी; पर्यायी मार्ग कोणते?
Kalyan TrafficSaam Tv
Published On: 
  • कल्याणमध्ये वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहेत

  • ७ प्रमुख रस्त्यांवर अवजड वाहने, बसला बंदी घालण्यात आली आहे

  • ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबरदरम्यान वाहतुकीत बदल राहणार आहेत

  • कल्याण वाहतूक पोलिसांनी पर्यायी मार्ग देखील सांगितले

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

नवरात्रोत्सव आणि दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर कल्याण शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत मोठे बदल केले आहेत. कल्याण पश्चिमेतील दुर्गामाता मंदिर आणि दुर्गाडी किल्ला परिसरात नवरात्रोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान शहरातील ७ प्रमुख मार्गांवर जड-अवजड, मल्टिएक्सल वाहने तसेच खासगी आणि शासकीय बसेसना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलिस उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी ५ ऑक्टोबर रोजी यासंदर्भात वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ४ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. मात्र पोलिस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका तसेच इतर अत्यावश्यक सेवांतील वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे. वाहनचालकांनी प्रशासनाने सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Kalyan Traffic: कल्याणमध्ये वाहतुकीत मोठे बदल, १० दिवस ७ मार्गावर प्रवेशबंदी; पर्यायी मार्ग कोणते?
Kalyan Latur Expressway : कल्याणवरून लातूरला पोहचा फक्त ४ तासांत, नवा महामार्ग होतोय तयार; कुठून कसा करता येणार प्रवास?

या ७ ठिकाणी जड वाहनांना प्रवेशबंदी -

१. कल्याण नाका : नवी मुंबई, पनवेल, महापे पाईपलाईन आणि मुंब्रा मार्गे कल्याण नाका येथून पत्रीपूलमार्गे कल्याण शहरात येणाऱ्या सहा चाकी, जड-अवजड, मल्टिएक्सल वाहने तसेच खासगी व शासकीय बसेसना प्रवेशबंदी राहणार आहे. या वाहनांसाठी मुंब्रा बायपास–खारेगाव टोलनाका–नाशिक-मुंबई महामार्ग हा पर्यायी मार्ग असेल.

२. खोणी निसर्ग ढाबा : तळोजा बायपासमार्गे खोणी निसर्ग ढाबा येथून कल्याणकडे येणाऱ्या जड-अवजड वाहनांना आणि बसेसना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या वाहनांनी बदलापूर-अंबरनाथ मार्गे काटई-बदलापूर चौक–लोढा पलावा–कल्याण फाटा मार्गाचा वापर करावा.

Kalyan Traffic: कल्याणमध्ये वाहतुकीत मोठे बदल, १० दिवस ७ मार्गावर प्रवेशबंदी; पर्यायी मार्ग कोणते?
Kalyan Crime: माझ्या एरियात धंदा करायचा असेल तर...; कल्याणमध्ये 'मज्जू' भाईची दहशत, व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवला अन्...

३. नेवाळी नाका : मलंग रोडमार्गे चक्कीनाका-पत्रीपूलच्या दिशेने येणाऱ्या जड-अवजड वाहनांना नेवाळी नाका येथे प्रवेशबंदी राहणार आहे. या वाहनांनी बदलापूर-अंबरनाथ महामार्गाचा वापर करावा.

४. श्रीराम चौक : श्रीराम चौकातून कोळसेवाडी वाहतूक उपविभागाच्या हद्दीत जाणाऱ्या जड-अवजड वाहनांसह बसेसना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. या वाहनांनी उल्हासनगर–शहाड–अंबरनाथ मार्गे जावे.

५. आधारवाडी चौक : शहाड, प्रेम ऑटो, दुर्गामाता चौक, कोनगाव आणि भिवंडीच्या दिशेने जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना आधारवाडी चौक येथे प्रवेशबंदी असेल. पर्यायी मार्ग म्हणून आधारवाडी चौक–गंधारी ब्रिज–बापगाव–सोनाळे मार्ग सुचविण्यात आला आहे.

Kalyan Traffic: कल्याणमध्ये वाहतुकीत मोठे बदल, १० दिवस ७ मार्गावर प्रवेशबंदी; पर्यायी मार्ग कोणते?
Kalyan: लोकलमधून अचानक ट्रॅकवर पडली 24 वर्षीय तरुणी; रेल्वे पोलिसांनी वाचवले प्राण

६. रांजनोली नाका : कोनगावमार्गे कल्याणकडे येणाऱ्या जड-अवजड वाहनांना रांजनोली नाका येथे प्रवेशबंदी राहणार आहे. या वाहनांनी मुंबई-नाशिक महामार्ग आणि खारेगाव टोलनाका मार्गे पुढे जावे.

७. सावद नाका : ठाणे ग्रामीण हद्दीतून बापगावमार्गे गंधारी ब्रिजकडून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या जड-अवजड वाहनांसह बसेसना सावद नाका येथे प्रवेशबंदी करण्यात आली आहे. संबंधित वाहनांनी सावद नाका–सोनाळे मार्गाचा वापर करावा. नवरात्रोत्सवाच्या काळात दुर्गामाता मंदिर, दुर्गाडी किल्ला परिसर तसेच कल्याण शहरातील प्रमुख मार्गांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन हे वाहतूक बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी आणि वाहनचालकांनी निर्बंधांचे पालन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Kalyan Traffic: कल्याणमध्ये वाहतुकीत मोठे बदल, १० दिवस ७ मार्गावर प्रवेशबंदी; पर्यायी मार्ग कोणते?
Kalyan Shiv Sena : 'उद्याच २५ लाख दे, नाहीतर...' शिवसेना नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी, ठाणे जिल्ह्यात पुन्हा खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com