कल्याण स्टेशनवर घडला संतापजनक प्रकार; १४ वर्षीय मुलीवर रेल्वे यार्डात नराधमाकडून अत्याचार

kalyan railway station news : कल्याण स्टेशनवर संतापजनक प्रकार घडला आहे. ४ वर्षीय मुलीवर रेल्वे यार्डात नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
kalyan shocking
kalyan news Saam tv
Published On
Summary

पुण्यानंतर कल्याणमध्ये घडली भयंकर घटना

कल्याण रेल्वे स्टेशनवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मुलीवर अत्याचाराची घटना घडल्याने परिसरात खळबळ

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

पुणे नसरापूर प्रकरण ताजं असताना कल्याणमधूनही धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याण रेल्वे स्थानकात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. कल्याण रेल्वे यार्डात १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण रेल्वे स्थानकावर १४ वर्षीय मुलगी नगरहून मामाला भेटण्यासाठी निघाली होती. पीडित मुलीला कल्याणहून खोपोलीला जायचे होते. खोपोलीला जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेनच्या प्रतीक्षेत होती. खोपोलीला जाणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर एका नराधमाची वाईट नजर पडली.

kalyan shocking
परीक्षेला जाताना रस्त्यात अडवलं अन्...; गावगुंडांकडून तरुणीची छेड, संगमनेरमधील धक्कादायक घटना

नराधमाची अल्पवयीन मुलीसोबत काहीही ओळख नव्हती. त्यानंतरही त्याने बोलायला सुरुवात केली. त्याने पीडित मुलीचा मोबाइल हिसकावून घेतला. नराधमाने मोबाइल हिसकावून घेतल्याने मुलगी घाबरली. तिने त्याच्याकडे मोबाइल मागितला. मोबाइल पाहिजे, तर माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल, असं नराधमाने मुलीला सांगितले.

kalyan shocking
पुणे पुन्हा हादरले, ४ मुलींवर अत्याचाराचा प्रयत्न; सोसायटीचा वॉचमन पोलिसांच्या ताब्यात

नराधम आणि पीडित मुलगी प्लॅटफॉर्मवरून चालू लागले. त्यानंतर अर्ध्या वाटेत नराधमाने मुलीला पोलीस स्टेशनला घेऊन न जाता मुलीला रेल्वे यार्डात घेऊन गेला. नराधमाने रेल्वे यार्डात नेऊन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलगी कशीबशी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात पोहोचली. पोलिसांनी तातडीने गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात केली.

सीसीटीव्हीच्या साह्याने कल्याण रेल्वे क्राईम ब्रँच आणि जीआरपी पोलिसांनी आरोपीला शोधून काढले. पीडित मुलीवर अत्याचार करणारा आरोपी आता कल्याण जीआरपी पोलिसांच्या ताब्यात आहे. कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात हा संतापजनक प्रकार घडल्याने पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकारानंतर आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com