Kalyan : गस्तीवेळी संशयास्पद हालचाल दिसली; थांबवण्याचा प्रयत्न करताच दोघांनी पळ काढला नंतर... कल्याण पोलिसांची मोठी कारवाई

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ३४ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले. या प्रकरणात मुख्य सूत्रधारासह ५ आरोपींना अटक करण्यात आली असून, कल्याण-नाशिक ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.
KALYAN DRUG BUST: ₹34 CRORE HEROIN SEIZED, 5 ACCUSED ARRESTED
KALYAN DRUG BUST: ₹34 CRORE HEROIN SEIZED, 5 ACCUSED ARRESTEDSaam tV
Published On
Summary
  • कल्याणमध्ये ३४ कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

  • एकूण ५ आरोपी अटकेत, मुख्य सूत्रधार पकडला

  • कल्याण-नाशिक ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश

  • एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याणमधून मोठी बातमी समोर आली आहे. अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी कारवाई करत तब्बल कोट्यवधींचे ड्रग्स जप्त केले आहे. कल्याण पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०३ यांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली असून, या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मोठ्या ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी आणि कर्मचारी महात्मा फुले चौक पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत होते. यावेळी कल्याण पश्चिमेतील सांगळेवाडी स्मशानभूमीजवळ दोन संशयित व्यक्ती दिसून आल्या. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान कासिम अब्दुल सत्तार वसईकर आणि कृष्णा नागप्पा हळेमणी यांच्या ताब्यातून ९ किलो २३६ ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त करण्यात आले.

KALYAN DRUG BUST: ₹34 CRORE HEROIN SEIZED, 5 ACCUSED ARRESTED
Bank Closed : SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी, शनिवारपासून ६ दिवस बँका बंद, कारण काय?

या मुद्देमालाची किंमत सुमारे ३२ कोटी ३२ लाख ६० हजार रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे. तसेच आरोपींकडून ३९ हजार रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासात कासिम वसईकर यांच्या घराची झडती घेतली असता आणखी ५३१.६९ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. या मुद्देमालाची किंमत सुमारे १ कोटी ८५ लाख ८५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

KALYAN DRUG BUST: ₹34 CRORE HEROIN SEIZED, 5 ACCUSED ARRESTED
Coconut Oil : सुकलेल्या नारळापासून ५ मिनिटात बनवा घरच्या घरी खोबरेल तेल, जाणून घ्या रेसिपी

सखोल तपासादरम्यान या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार अमजद युसुफ पठाण असल्याचे निष्पन्न झाले. अमजद पठाण हा कल्याण आणि नाशिक परिसरात अंमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने गणेशन पुथुस्वामी जंगमार उर्फ अण्णा याला हेरॉईन पुरवल्याचे तपासात उघड झाले. तसेच कासिम वसईकर आणि सद्दाम गफुर शेख हे त्याच्यासाठी ड्रग्स विकण्याचे काम करत होते.

KALYAN DRUG BUST: ₹34 CRORE HEROIN SEIZED, 5 ACCUSED ARRESTED
Shocking : नवऱ्यापासून घटस्फोट घेतला, मावशीच्या मुलासोबत रिलेशनमध्ये आली; बॉयफ्रेंडने असं काही केलं की महिला हादरून गेली

पोलिसांनी या प्रकरणात गणेशन जंगमार याला ५ एप्रिल, सद्दाम शेख याला ६ एप्रिल आणि मुख्य आरोपी अमजद पठाण याला २१ मे २०२६ रोजी अटक केली. न्यायालयाने अमजद पठाण याला १ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत एकूण ९ किलो ७६८ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत ३४ कोटी १८ लाख ८४ हजार रुपये आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या रॅकेटमधील इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com