अभिजीत देशमुख, साम टीव्ही प्रतिनिधी
कल्याण : कल्याणच्या नामांकित हॉटेलमध्ये पावभाजीत लाेखंडी तुकडा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संबंधित ग्राहकाने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
उल्हासनगर येथील सी ब्लॉक परिसरात राहणारे सुबोध गवळी त्यांची पत्नी आणि दोन मुलींसह राहतात. दिवाळीच्या निमित्ताने हे कुटुंब शुक्रवारी संध्याकाळी कल्याणला आलं होतं. त्यांची चांगल्या हॉटेलात नाश्ता करण्याची इच्छा होती. ते कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौकातील रामदेव हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेले. सुबोध गवळी यांनी त्यांच्यासाठी पावभाजीची दिली. थोड्याच वेळात त्यांच्या टेबलवर पावभाजी आली.
पावभाजीचा घास खाल्ला असता त्याच्या दाताखाली काही जड वस्तू आली. तिने ती गिळण्याआधीच तोंडाबाहेर काढली. आधी वाटले की, तो खडा असावा. तो पाण्याने धुतल्यावर तो लोखंडाचा तुकडा असल्याचे आढळून आले. यानंतर संबंधित कुटुंबीयांनी हॉटेल व्यवस्थापकांना याची माहिती दिली. त्यांनी त्यांची चूक मान्य करण्याऐवजी गवळी कुटुंबाला उलटसुलट उत्तरे देत उद्धटपणा केला.
सुबोध गवळी यांनी लगेचच महात्मा फुले पोलिस ठाण्यात पोहचले. त्या ठिकाणी पोलिस ठाण्यात या प्रकरणाची तक्रार दिली. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक स्वप्नील भुजबळ यांनी तक्रार आल्यावर पोलिसांनी हॉटेलात जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. त्यानंतर संबंधित ग्राहकाची तक्रार दाखल करुन घेतली आहे. या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सांगितले .
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.