Ulhasnagar News : उल्हासनगर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Ulhasnagar Municipal Corporation Additional Commissioner : उल्हासनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या विरोधात एका महिला कनिष्ठ लिपिकेने विनयभंगाचा दाखल करण्यात आला आहे.
Ulhasnagar News
Ulhasnagar NewsSaam Digital
Published On

उल्हासनगर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या विरोधात विनयभंगाचा दाखल करण्यात आला आहे. एका महिला कनिष्ठ लिपिकेने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गेले वर्षभर हे प्रकरण चर्चेत असल्याचं बोललं जात आहे.

Ulhasnagar News
Nandurbar Crime: बदलापूरनंतर नंदूरबार हादरले! शाळेच्या सफाई कर्मचाऱ्यानं १० वर्षांच्या मुलीला मोबाइलवर दाखवले अश्लील व्हिडिओ

उल्हासनगर महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या एका महिला कनिष्ठ लिपिकाने अतिरिक्त आयुक्त जमिर लेंगरेकर यांच्यावर विनयभंगाचे आरोप केले आहेत. महिला कर्मचाऱ्याने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली आहे. 2022 ते 2023 या कालावधीत जमीर लेंगरेकर यांनी त्यांच्या कॅबिनमध्ये तिला वारंवार अश्लील शब्दांत संभाषण केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान जमीर लेंगरेकर यांच्याशी संपर्क साधला असता सदर महिला कर्मचारी एका व्यक्तीसोबत माझ्याकडे आल्या होत्या. मात्र मी यासाठी नकार दिला, त्यामुळे हेतूपुरस्कर माझ्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

महिला कर्मचाऱ्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, जेव्हा तिने जमीर लेंगरेकर यांना वारंवार अश्लील संभाषण करण्याबाबत रोखले, तरी देखील त्यांनी तिच्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप पीडित महिला कर्मचारीने केला आहे. या घडामोडीनंतर तिने उल्हासनगर महानगरपालिकेतील 'विशाखा समिती'कडे लेखी तक्रार दाखल केली. समितीने या तक्रारीवर चौकशी करून 5 सप्टेंबर 2023 रोजी अहवाल सादर केला होता. मात्र तत्कालीन आयुक्त अजीज शेख यांनी या अहवालाबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता, सदर प्रकरणाने उल्हासनगर महानगरपालिकेत खळबळ उडवली आहे, आणि आता या तक्रारीची सखोल चौकशी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Ulhasnagar News
Vijay Wadettiwar : 'अशा वाऱ्यामुळे कोकणातला नारळही पडत नाही'; राजकोट शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

याबाबत अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सदर महिला कर्मचारी यांना पुन्हा मालमत्ता विभागात बदली पाहिजे होती, तसेच एका होल्डिंग कंपनीला उल्हासनगर महापालिकेने ४१ लाखांचा दंड भरण्याची नोटीस दिली होती, तो दंड कमी करावा यासाठी सदर महिला कर्मचारी एका शर्मा नावाच्या व्यक्तीसोबत माझ्याकडे आल्या होत्या. मात्र मी यासाठी नकार दिला, त्यामुळे हेतूपुरस्कर माझ्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Ulhasnagar News
Nana Patole : 'हे सरकार कमिशनखोर, शिवपुतळा केवळ दिखाव्यासाठी उभा केला'; नाना पटोले यांचे सरकारवर गंभीर आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com