कल्याण हिट अॅण्ड रन प्रकरणात खळबळजनक ट्विस्ट, फरार चालक हायप्रोफाईल कुटुंबातील, २५ वर्षाच्या तरूणाला न्याय मिळणार का?

Kalyan Hit and Run Case : कल्याणच्या आधारवाडी परिसरात भरधाव आलिशान कारच्या धडकेत २५ वर्षीय सुनील कोळीचा मृत्यू झाला. घटनेनंतर ३६ तासांहून अधिक काळ उलटूनही चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.
Kalyan Sunil Koli Accident Death News
Kalyan Sunil Koli Accident Death NewsSaam TV
Published On: 

संघर्ष गांगुर्डे, कल्याण प्रतिनिधी

Kalyan Sunil Koli Accident Death News : कल्याण पश्चिम येथील आधारवाडी परिसरात झालेल्या अपघाताला उलटून ३६ तास झाले, पण आरोपीला अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही. आलिशान कारच्या धडकेत २५ वर्षांच्या सुनील कोळी याचा मृत्यू झाला होता. या अपघात प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आलाय. यातील आरोपी हा हायप्रोफाईल कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे.

रस्त्यावर मॉर्निंग वॉक करत असताना २५ वर्षांच्या सुनील कोळी या तरूणाला भरधाव वेगात असणाऱ्या अलिशान कारने जोरदार धडक दिली होती. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या अपघातानंतर कारचालक आपली गाडी घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. त्यानंतर पोलिसांनी या कार ताब्यात घेतली, पण अद्याप आरोपीचा शोध घेतला नाही. त्यामुळे नागरिक संतापले आहेत.

Kalyan Sunil Koli Accident Death News
Election: पदवीधर निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांचा दणका; कराळे मास्तरांची थेट ६ वर्षांसाठी पक्षातून हाकालपट्टी

अपघाताची घटना घडून ३६ तास पेक्षा जास्त वेळ उलटून गेला तरीही खडकपाडा पोलिसांच्या हाती अद्याप मुख्य चालक लागलेला नाही. विशेष म्हणजे, हा फरार कारचालक कल्याणमधील एका हायप्रोफाईल कुटुंबातील तरुण असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी अद्यापही पोलिसांच्या ताब्यात नसल्यामुळे पोलिसांच्या तपासावर आणि कार्यपद्धतीवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Kalyan Sunil Koli Accident Death News
Vande Bharat : महाराष्ट्रातील पहिली स्लीपर वंदे भारत १ नोव्हेंबरपासून धावणार; जाणून घ्या, तिकीट किती आणि थांबे कोणते

नेमकी घटना कशी घडली?

आधारवाडी परिसरात सुनील कोळी नेहमीप्रमाणे रस्त्यावर चालत असताना, मागून आलेल्या एका भरधाव चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सुनील कोळी थेट रस्त्यावरील एका कमानीवर जाऊन आदळला. या अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Kalyan Sunil Koli Accident Death News
Kitchen Hacks :स्टील, नॉन-स्टिक की लोखंडी? चुकीच्या भांड्यात स्वयंपाक करताय तर आजच थांबा

तपासाला वेग आणि पोलिसांसमोर मोठी आव्हाने

पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ती महागडी कार शोधून काढली. मात्र, गाडी सापडल्यानंतरही चालक पोलिसांच्या हाती न लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तसेच, हा अपघात नेमका कसा घडला आणि रस्त्यावर लावलेल्या कमानीमुळे या दुर्घटनेच्या तीव्रतेत काही भर पडली का, या सर्व तांत्रिक बाबींचीही कसून चौकशी केली जात आहे.

हायप्रोफाईल कनेक्शनमुळे या प्रकरणात आरोपीला पाठीशी घातले जात आहे का, आणि २५ वर्षीय सुनील कोळीच्या कुटुंबीयांना खरोखरच न्याय मिळणार का, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com