संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कल्याण पूर्वेतील पत्रीपूल परिसरात भावासोबत सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर चार ते पाच जणांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात अरमान शेख हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्रीपूल परिसरात अरमानच्या भावाचा काही तरुणांसोबत वाद सुरू होता. हा वाद मिटवण्यासाठी अरमान शेख याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र तू या वादात मध्यस्थी का करतोस? असा राग मनात धरून चार ते पाच तरुणांनी अरमानवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे समोर आले आहे. भररस्त्यात झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हल्ल्यात अरमान जखमी झाल्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलिसांनी तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यात येत आहे.
भररस्त्यात झालेल्या या हल्ल्यामुळे पत्रीपूल परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे तसेच त्यांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
या हल्ल्यामागील नेमके कारण, हल्ल्यात सहभागी असलेले आरोपी आणि घटनेपूर्वी झालेल्या वादाची पार्श्वभूमी याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी जखमी अरमान शेख याचा जबाब महत्त्वाचा ठरणार असून, आरोपींवर कोणती कारवाई केली जाते याकडे आता लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.