Kalyan : शिवीगाळीचा जाब विचारणे पडले महागात; कल्याणमध्ये महिलेसह मुलीला आणि दुकानदाराला मारहाण

Kalyan News : कल्याण पूर्वेतील नेतिवली परिसरात दुकानासमोर सुरू असलेल्या शिवीगाळीचा जाब विचारल्याने महिलेसह तिच्या मुलीला आणि दुकानदाराला मारहाण. संपूर्ण प्रकार CCTV मध्ये कैद झाला असून, पोलिसांनी NCR नोंदवून तपास सुरू केला आहे.
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On
Summary
  • कल्याण पूर्वेतील नेतिवली परिसरात दुकानासमोर शिवीगाळीचा जाब विचारल्याने वाद

  • महिलेसह तिच्या मुलीला आणि वादात मध्यस्थी करणाऱ्या दुकानदाराला मारहाण

  • घटनेचा संपूर्ण प्रकार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

दुकानासमोर सुरू असलेल्या शिवीगाळीचा जाब विचारणे एका महिलेला आणि तिच्या मुलीला चांगलेच महागात पडले. शिवीगाळ करणाऱ्या तरुणांना जाब विचारल्याच्या रागातून महिलेसह तिच्या मुलीला आणि दुकानदाराला मारहाण केल्याची घटना कल्याण पूर्वेतील नेतिवली परिसरात घडली आहे. या संपूर्ण घटनेचा थरारक प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचे फुटेज सध्या समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नेतिवली परिसरातील एका किराणा दुकानासमोर काही तरुणांचा जमाव होता. यावेळी संबंधित तरुणांकडून मोठमोठ्याने शिवीगाळ सुरू होती. दुकानाजवळ सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी होती. दरम्यान, एका महिलेने पुढे येत तरुणांना शिवीगाळ का करत आहात, असा जाब विचारला. महिलेने जाब विचारल्याने त्यापैकी एक तरुण संतप्त झाला. त्यानंतर त्याने महिलेशी वाद घालत तिच्यावर हात उगारल्याचे सांगण्यात येत आहे. हा प्रकार पाहून महिलेची मुलगी आणि दुकानदार मध्ये पडले. मात्र, वाद वाढत गेला आणि संबंधित तरुणाने महिलेसह तिच्या मुलीलाही मारहाण करायला सुरुवात केली. दुकानदारालाही मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे.

Kalyan News
Supreme Court : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रासह ८ राज्यातील उच्च न्यायालयांना नवे मुख्य न्यायाधीश; पाहा कोणाची कुठे नियुक्ती

अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मारहाण सुरू असताना स्थानिक नागरिकांनी तातडीने हस्तक्षेप केला. नागरिकांनी मध्यस्थी करत महिला आणि तिच्या मुलीची सुटका केली. त्यानंतर जखमी महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी महिलेने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एनसीआर नोंद केली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Kalyan News
Heart Attack : हार्ट अटॅक येण्यापूर्वी ३० दिवस आधी शरीरात दिसतील 'ही' ६ लक्षणे; दुर्लक्ष करू नका नाहीतर....

दरम्यान, या मारहाणीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. फुटेजमध्ये संबंधित व्यक्तींकडून मारहाण होत असल्याचे दिसून येत असल्याने पोलिसांकडून या सीसीटीव्हीची तपासणी केली जात आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तक्रारीच्या आधारे पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com