कल्याणमध्ये बुद्धभूमीवरून रणसंग्राम; १५ जूनपासून बेमुदत धरणे आंदोलन

Buddhbhumi Foundation Protest Kalyan June 15 Indefinite Dharna: कल्याण पूर्वेतील बुद्धभूमी फाऊंडेशन आणि महापालिका यांच्यातील जमीन वाद चिघळला असून, १५ जूनपासून बेमुदत धरणे आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.
Supporters of Buddhbhumi Foundation gather ahead of the indefinite protest in Kalyan over the ongoing land dispute with civic authorities.
Supporters of Buddhbhumi Foundation gather ahead of the indefinite protest in Kalyan over the ongoing land dispute with civic authorities.saam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण पूर्वेतील वालधुनी परिसरातील बुद्धभूमी फाऊंडेशन आणि प्रशासन यांच्यातील जमिनीच्या वादावरून संघर्ष अधिक तीव्र होत असून, फाऊंडेशनचे संचालक भंते गौतमरत्न महाथेरो यांनी १५ जूनपासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाजवळ बेमुदत धरणे आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. प्रशासनाकडून केवळ तोंडी आश्वासने दिली जात असून, मागण्यांबाबत लेखी आदेश त्याच प्रमाणे सरकारी जीआर मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे. प्रेम ऑटो ते विठ्ठलवाडी दरम्यान प्रस्तावित चारपदरी उड्डाणपूल प्रकल्पासाठी सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान बुद्धभूमी फाऊंडेशनच्या जागेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेने केलेली कारवाई बेकायदेशीर असून या प्रकरणात न्याय मिळावा, अशी मागणी फाऊंडेशनकडून करण्यात आली आहे.

Supporters of Buddhbhumi Foundation gather ahead of the indefinite protest in Kalyan over the ongoing land dispute with civic authorities.
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ...तर eKYC पुन्हा सुरू करणार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

भंते गौतमरत्न महाथेरो यांनी सांगितले की, संबंधित भूमी ही सार्वजनिक कार्यासाठी राखीव असून १९८०-८१ पासून त्या जागेच्या वापरासंदर्भातील विविध शासकीय नोंदी उपलब्ध आहेत. मात्र, चुकीच्या टीडीआर व्यवहाराच्या माध्यमातून महापालिकेने ही जागा आपल्या नावावर केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच उड्डाणपूल प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेत आवश्यक ती दक्षता घेतली गेली नसल्याचाही दावा त्यांनी केला.

Supporters of Buddhbhumi Foundation gather ahead of the indefinite protest in Kalyan over the ongoing land dispute with civic authorities.
KEM Hospital On Sejal Pawar: प्रणित मोरेच्या शोमध्ये नको ते बरळली, आता डॉ. सेजल पवारवर KEM करणार कारवाई

या प्रकरणी मागासवर्गीय आयोगाने सुनावणी घेत आदेश दिल्याचेही फाऊंडेशनने म्हटले आहे. फाऊंडेशनच्या वतीने जागेच्या मोबदल्यात आर्थिक भरपाई न स्वीकारता त्या ठिकाणी विपश्यना केंद्र, शाळा आणि रुग्णालय उभारून देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष करून महापालिकेने पोलीस बंदोबस्तात कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान परिसरातील वास्तू, मूर्ती तसेच सुमारे ४२ झाडांची बेकायदेशीररीत्या तोडफोड व नासधूस झाल्याचा गंभीर आरोपही भंते गौतमरत्न महाथेरो यांनी केला आहे.

Supporters of Buddhbhumi Foundation gather ahead of the indefinite protest in Kalyan over the ongoing land dispute with civic authorities.
Pimpri - Chinchwad Fire News | पिंपरी चिंचवडमध्ये फटाक्यांच्या दुकानांना लागली आग

राज्य सरकारने आमच्या मागण्यांबाबत स्पष्ट आणि लेखी जीआर काढून निर्णय जाहीर करावा, अशी मागणी करत त्यांनी १५ जूनपासून सुरू होणारे आंदोलन शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने यशस्वी करण्याचे आवाहन समर्थकांना केले आहे. बुद्धभूमी फाऊंडेशनच्या जमिनीच्या वादावर देशभरातील नागरिक, सामाजिक संघटना आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले असून, आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com