संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही
कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि तपासातील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर पोलीस शिपायापासून सहाय्यक पोलीस आयुक्तपदापर्यंत मजल मारणारे अशोक होनमाने यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने त्यांच्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेसाठी त्यांना अति उत्कृष्ट सेवा पदकाने गौरविले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट रोजी ठाणे पोलीस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील घानंद या ग्रामीण भागातून आलेल्या अशोक होनमाने यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत आपल्या करिअरला आकार दिला. गावातील शाळेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण घेतले. १९८९ मध्ये पोलीस शिपाई म्हणून मुंबई पोलीस दलात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या पोलीस कारकिर्दीला सुरुवात झाली. नोकरी सांभाळत त्यांनी रात्र महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. पुढे एमपीएससी परीक्षेची तयारी करून १९९५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून अधिकारी पदावर प्रवेश केला.
त्यानंतर मुंबई, दहिसर, नवी मुंबई, पालघर, माणिकपूर, भिवंडी आणि कल्याण अशा विविध ठिकाणी त्यांनी पोलीस सेवेत जबाबदाऱ्या पार पाडल्या. महात्मा फुले पोलीस ठाण्यासह अनेक ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम करताना त्यांनी गुंतागुंतीच्या गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. सध्या ते कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा तपास, आरोपींचा माग काढणे आणि आव्हानात्मक प्रकरणांचा छडा लावण्यात होनमाने यांचे विशेष कौशल्य मानले जाते. कर्तव्याप्रती असलेली निष्ठा आणि तपासातील बारकावे हेरण्याची हातोटी यामुळे त्यांनी पोलीस दलात वेगळी ओळख निर्माण केली. शिपाई म्हणून सुरू झालेली सेवा, अधिकारी पदावरील जबाबदाऱ्या आणि आता सहाय्यक पोलीस आयुक्तपदापर्यंतचा प्रवास हा त्यांच्या मेहनतीची आणि जिद्दीची साक्ष देणारा आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या अति उत्कृष्ट सेवा पदकामुळे त्यांच्या सेवेला राष्ट्रीय स्तरावर गौरवाची पावती मिळाली असून, त्यांच्या या सन्मानाचे पोलीस वर्तुळातून कौतुक होत आ
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.