

Jitendra Awhad News: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुप्तभेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ही भेट झाल्याची बोललं जातंय. यानंतर जयंत पाटील भाजपमध्ये जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. जयंत पाटील यांच्याबद्दलच्या चर्चांवर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
जितेंद्र आव्हाड यांनी जयंत पाटील यांची भेट घेतल्यानंतर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड ट्विट करत म्हणाले, 'राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे.जाणून बुजून ते कोणाला तरी भेटून आले,ते मंत्री होणार,त्यांनी गावातून लोक बोलावली,अशा प्रकारच्या बातम्या पेरण्यात येत आहेत. ही पेरणी कशासाठी केली जातेय,हे आम्हाला बरोबर समजतंय'.
आव्हाड पुढे म्हणाले, 'जयंत पाटील यांच्यासोबत माझं वैयक्तिक बोलण झालं. पण त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की," जितेंद्र, साहेबांनी ईशारा दिलेला आहे लढायचंय. आणि आता थांबणे नाही." मला वाटत नाही की,प्रत्येक नेत्याने दररोज येऊन सांगावं की,"आम्ही लढणार आहोत,आम्ही लढणार आहोत." आम्ही मागेच सांगितल आहे की, 'आम्ही पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत." त्या भूमिकेत काहीच फरक पडणार नाही'.
'तेव्हा कृपया या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. आमचं ठरलंय,आम्ही लढणार म्हणजे लढणारच. लोकशाहीचं पवित्र मंदिर वाचवणे ही काळाची गरज आहे. आणि ते जर आम्ही केलं नाही तर, पुढची पिढी आम्हाला कधीच माफ करणार नाही, असे आव्हाड पुढे म्हणाले.
'सत्ता येते जाते, पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातून निर्माण झालेली संसदीय लोकशाही वाचली नाही, तर पुढची पिढी आम्हाला कधीच क्षमा करणार नाही, असेही ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.