Jalgaon Mla Accident News : शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीला अपघात, पोलीस व्हॅनची कारला जोरदार धडक

Accident News : अमळनेर शहराजवळ असलेल्या अंबर्षी महाराज टेकडीजवळ हा अपघात झाला आहे.
MLA chimanrao patil car accident
MLA chimanrao patil car accidentSaam Tv

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील पारोळा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या गाडीला अपघात झाला आहे. अमळनेर शहराजवळ असलेल्या अंबर्षी महाराज टेकडीजवळ हा अपघात झाला आहे.

आमदार चिमणराव पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस सुरक्षारक्षकांच्या पोलीस व्हॅनने त्यांच्या कारला मागून धडक दिली. या अपघातात चिमणराव पाटील यांना सुदैवाने गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र पोलीस व्हॅन आणि चिमणराव पाटलांच्या कारचं मोठं नुकसान झाले आहे. (Accident News)

MLA chimanrao patil car accident
Jayant Patil on may Join BJP : भाजपसोबत जाण्याच्या चर्चांवर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील हे त्यांच्या खाजगी वाहनाने चोपडा येथे कामानिमित्त जात होते. त्यांना पुरवण्यात आलेल्या ताफ्यातील पोलीस सुरक्षा वाहनाने अमळनेर -चोपडा रस्त्यावरील सिंधी कॉलनीजवळ आमदारांच्या वाहनाला मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला.  (Latest Marathi News)

MLA chimanrao patil car accident
Maharashtra Rain Update: राज्यात उद्या पावसाची विश्रांती; कोणत्याही जिल्ह्याला रेड, ऑरेंज, यलो अलर्ट नाही

यावेळी आमदारांच्या वाहनात वाहनचालक, आमदार चिमणराव पाटील, त्यांचे स्वीय सहाय्यक तर पोलिसांच्या वाहनात ३ ते ४ पोलीस कर्मचारी होते. मोठा अनर्थ टळल्याचं आमदार पाटील यांनी सांगितलं. अपघातानंतर दुसऱ्या वाहनाने आमदार चिमणराव पाटील हे पारोळ्याकडे रवाना झाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com