Jayant Patil
Jayant Patil saam tv

Jayant Patil on may Join BJP : भाजपसोबत जाण्याच्या चर्चांवर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Political news : मी अमित शाहांना कधी भेटलो याचं संशोधन करा, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं.
Published on

Mumbai News : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि शरद पवार यांचे निकटवर्तीय जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गुप्तभेट घेतल्याची माहिती समोर आली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने ही भेट झाल्याची चर्चा होती. या चर्चांवर आता जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मी  मंत्री अमित शाह कधी भेटलो याचं संशोधन करा. चर्चा कोण करतंय त्यांच्याकडे चौकशी करा. मी कालही इथेच होतो आणि आजही इथेच आहे. मी पुण्याला कधी गेलो तुम्हीच सांगा, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं.

मी कालही पवार साहेबांना भेटलो काल रात्री मी माझ्या पक्षातले वरिष्ठ आमदार आहेत त्यांच्याशी देखील चर्चा केली. आज सकाळी देखील मी पवार साहेबांना भेटलो, अशा माहिती जयंत पाटील यांनी दिली.

Jayant Patil
Eknath Shinde Speech: 'अमित शहांचे नेतृत्व सहकार क्षेत्रासाठी वरदान...' मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून कौतुकाचा वर्षाव

आपण ज्या बातम्या चालवल्या आहेत की मी दिल्लीत भेटलो किंवा अन्य कुठे भेटलो यात कुठलीही स्पष्टता नाही. ज्या बातम्या येत आहे त्यातून माझी करमणूक होत आहे. माझ्याबद्दल गैरसमज यातून पसरत आहे. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. (Political News)

Jayant Patil
Rohit Pawar News: सात महिन्यात ४२. ४४ कोटींची उधळपट्टी... जाहिरात खर्चावरुन रोहित पवारांचा शिंदे- फडणवीस सरकारवर हल्लाबोल

मी शरद पवार साहेबांशी रोज भेट घेत आहे. कुठे गेलोच तर तुम्हाला सांगेन, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, अशा बातम्या चालवताना खात्री बाळगूनच त्या चालवायला हव्यात, असंही जयंत पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com