Rohit Pawar News: सात महिन्यात ४२. ४४ कोटींची उधळपट्टी... जाहिरात खर्चावरुन रोहित पवारांचा शिंदे- फडणवीस सरकारवर हल्लाबोल

MLA Rohit Pawar Tweet: शिंदे फडणवीस सरकारच्या काळातील जाहिरात खर्चावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.
Rohit Pawar On Shinde Fadanvis Government
Rohit Pawar On Shinde Fadanvis GovernmentSaam TV

Maharashtra Politics: शिंदे फडणवीस सरकारच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या जाहिरात खर्चावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे. राज्य सरकारने गेल्या ७ महिन्यांत ४२.४४ कोटी रुपयांचा खर्च जाहिरातींवर केल्याचे सांगत रोहित पवार यांनी ट्वीट करत जोरदार टीका केली आहे.

Rohit Pawar On Shinde Fadanvis Government
Buldhana News : रेशनाचा साठवलेला २५ क्विंटल तांदूळ जप्त; पुरवठा विभाग आणि पोलिसांची कारवाई

याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शिंदे- फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील जाहीरातींवर झालेल्या खर्चाची यादीत प्रसिद्ध केली आहे. या अवाढव्य खर्चावरुन त्यांनी खरच याची गरज आहे का? असे म्हणत राज्य सरकारवर कडक शब्दात टीका केली आहे. त्यांचे हे ट्वीट सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

सरकारच्या पहिल्या सात महिन्यात जाहिरातीवरील खर्च ₹42.44 कोटी म्हणजेच दिवसाला ₹20 लाख खर्च झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामध्ये शासन आपल्या दारी योजनेचा निव्वळ जाहिरातीचा खर्च ₹52.90 कोटी इतका आहे. मागच्या वर्षात राबविलेल्या योजनांची यंदा जाहिरात करण्यासाठी ₹26 कोटी खर्च करण्यात आला आहे. सरकारकडून सत्ताधारी आमदारांच्या सुरक्षेसाठी एका वर्षाला ₹150 कोटी खर्च होत असल्याची माहितीही रोहित पवार यांनी दिली आहे.

Rohit Pawar On Shinde Fadanvis Government
Sangli Crime News: 'तुझ्याच आठवणीत जगत राहीन...', मोबाइलवर स्टेटस ठेवून तरुणाने नदीत मारली उडी; सांगलीतील धक्कादायक घटना

योजना राबविल्या आहेत,कामं केली आहेत. तर इतकी जाहिरात करण्याची खरंच गरज आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच केलेली कामं जनतेपर्यंत पोहचण्यासाठी जाहिराती गरजेच्या आहेत का? हा वायफळ खर्च टाळून, सर्वसामान्यांसाठी कुठली योजना राबविता आली असती का? तुमचं काय मत आहे? असेही या ट्वीटमध्ये रोहित पवार यांनी म्हणले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com