Maharashtra Rain Update: राज्यात उद्या पावसाची विश्रांती; कोणत्याही जिल्ह्याला रेड, ऑरेंज, यलो अलर्ट नाही

Maharashtra Rain Alert Weather Updates: राज्यात उद्या पावसाची विश्रांती; कोणत्याही जिल्ह्याला रेड, ऑरेंज, यलो अलर्ट नाही
Maharashtra Rain Alert Weather Updates
Maharashtra Rain Alert Weather UpdatesSaam TV

Maharashtra Rain Alert Weather Updates: भारतीय हवामान खात्याच्या माहिती नुसार राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड ऑरेंज, येलो अलर्ट, देण्यात आलेला नाही, अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून प्रसिद्धीस देण्यात आली आहे.

मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून आज (दि. ६ ऑगस्ट ) संध्याकाळी ६:०० वाजता प्राप्त आकडेवारीनुसार हवामान सद्यस्थिती आणि अंदाज प्रसिद्धीसाठी देण्यात आला आहे.

Maharashtra Rain Alert Weather Updates
Term Insurance म्हणजे नक्की काय असतं? लाइफ इन्शुरन्सपेक्षा कसा आहे वेगळा? जाणून घ्या याचे फायदे आणि नुकसान...

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये 65 मि मी पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.  (Latest Marathi News)

राज्यातील काही महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा (दलघमी) आणि धरणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग (क्युमेक्स) खालीलप्रमाणे-:

हतनूर (जळगाव) (एकूण क्षमता २५५ दलघमी) आत्तापर्यंत ४५७ क्युमेक्स विसर्ग

गोसेखुर्द (भंडारा) (एकूण क्षमता ७४०.१७ दलघमी) आत्तापर्यंत ३१२८.३५ क्युमेक्स विसर्ग

भंडारदरा (अहमदनगर) (एकूण क्षमता ३०४.१० दलघमी) आत्तापर्यंत ५४.०८ क्युमेक्स विसर्ग

दारणा (नाशिक) (एकूण क्षमता २०२.४४ दलघमी) आत्तापर्यंत ३५.४० क्युमेक्स विसर्ग

दूधगंगा (कोल्हापूर) (एकूण क्षमता ६७९.११ दलघमी) आत्तापर्यंत ३६ क्युमेक्स विसर्ग

राधानगरी (कोल्हापूर) (एकूण क्षमता २१९.९७ दलघमी) आत्तापर्यंत ४० क्युमेक्स विसर्ग

ऊर्ध्व वर्धा (अमरावती) (एकूण क्षमता ५६४.०५ दलघमी) आत्तापर्यंत १४१ क्युमेक्स विसर्ग

बेंबळा (यवतमाळ) (एकूण क्षमता १८३.९४ दलघमी) आत्तापर्यंत ४० क्युमेक्स विसर्ग

निम्न वर्धा (वर्धा) (एकूण क्षमता २१६.८७ दलघमी) आत्तापर्यंत १७.४३ क्युमेक्स विसर्ग

वारणा (सांगली) (एकूण क्षमता ७७९.३४ दलघमी) आत्तापर्यंत ४५ क्युमेक्स विसर्ग

सूर्या धामणी (ठाणे) (एकूण क्षमता २७६.३५ दलघमी) आत्तापर्यंत १८.४० क्युमेक्स विसर्ग

चासकमान (पुणे) (एकूण क्षमता २१४.५० दलघमी) आत्तापर्यंत ३१ क्युमेक्स विसर्ग

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी गाठली आहे.

Maharashtra Rain Alert Weather Updates
Amrit Bharat Station Scheme: महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्थानक होणार चकाचक, पाहा संपूर्ण यादी...

पुढील २४ तासांकरिता किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसाठी पहाटे ३:५३ वाजता व दुपारी ३: ५६ वाजता भरतीच्या वेळा देण्यात आल्या असून सकाळी ३.९ मीटर आणि दुपारी ४.५ मीटर पर्यंत समुद्राच्या लाटा येण्याचा अंदाज आहे.

वीज कोसळण्याची शक्यता असणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांनी अद्ययावत व सतर्क राहण्यासाठी आपल्या मोबईलमध्ये “DAMINI” हे ॲप डाउनलोड व इन्स्टॉल करावे. हे ॲप वापरकर्त्यांना 20 ते 40 किलोमीटर GPS नोटिफिकेशनद्वारे सतर्क करते तसेच घ्यावयाच्या खबरदारीचे उपाय देखील देते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com