Term Insurance म्हणजे नक्की काय असतं? लाइफ इन्शुरन्सपेक्षा कसा आहे वेगळा? जाणून घ्या याचे फायदे आणि नुकसान...

Term Insurance and Life Insurance Difference: Term Insurance म्हणजे नक्की काय असतं? लाइफ इन्शुरन्सपेक्षा कसा आहे वेगळा? जाणून घ्या याचे फायदे आणि नुकसान...
Term Insurance
Term InsuranceSaam Tv
Published On

Term Insurance Benefits and Drawbacks: आजची जीवनशैली बघता कोणाच्या समोर कधी कठीण प्रसंग येईल, हे सांगता येत नाही. म्हणूनच कुटुंबाला आर्थिक सुरक्षा प्रदान करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत विमा तुमच्यासाठी संरक्षणात्मक कवच म्हणून काम करतो. परंतु लाइफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्स असे अनेक प्रकारचे इन्शुरन्स आहेत.

या सर्व प्रकारच्या विम्यामध्ये लाइफ इन्शुरन्स आणि टर्म इन्शुरन्सबाबत सर्वाधिक संभ्रम आहे. टर्म इन्शुरन्स म्हणजे काय, लाइफ इन्शुरन्सपेक्षा तो कसा वेगळा आहे आणि तो विकत घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, हे आपण जाणून घेणार आहोत.

Term Insurance
Fixed Deposit Scheme: SBI ची 400 दिवसांची जबरदस्त FD योजना, दरवर्षी व्याजातून मिळणार इतके पैसे...

टर्म आणि लाइफ इन्शुरन्स यात काय आहे फरक?

Life Insurance पॉलिसी जीवनाला कव्हरेज देण्यासाठी काम करते. यामध्ये जर इन्शुरन्सधारक व्यक्तीसोबत कोणत्याही प्रकारचा अपघात झाला आणि त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या नॉमिनी किंवा कुटुंबातील सदस्यांना इन्शुरन्स कंपनीकडून आर्थिक मदत म्हणून मृत्यू आणि मॅच्युरिटी दोन्ही लाभ मिळतात. (Latest Marathi News)

Term Insurance ही एक प्रकारची Life Insurance पॉलिसी आहे, जी ठराविक पेमेंट दराने मर्यादित कालावधीसाठी कव्हरेज प्रदान करते. अशा परिस्थितीत पॉलिसीच्या मुदतीदरम्यान इन्शुरन्सधारकाचा मृत्यू झाल्यास, कव्हरची रक्कम नॉमिनीला एकरकमी दिली जाते. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक सुरक्षितता मिळते. लाइफ इन्शुरन्स सारख्या टर्म इन्शुरन्समध्ये मॅच्युरिटी रिटर्न मिळत नाही.

Term Insurance
National Saving Certificate Scheme: बँकेत एफडी करण्याऐवजी या सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा, मिळेल जबरदस्त फायदा

टर्म इन्शुरन्स खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

तुमचा उत्पन्नाचा आधार समजून घ्या आणि त्यावर आधारित इन्शुरन्स संरक्षण ठरवा. टर्म इन्शुरन्स योजना उत्पन्नाच्या 10-15 पट असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे.

तुम्ही जितक्या लवकर टर्म इन्शुरन्स खरेदी कराल तितका जास्त फायदा होईल. तरुण वयात, तुम्ही परवडणाऱ्या प्रीमियमवर विमा लॉक करू शकाल.

उत्पन्नाचे स्रोत, कर्ज आणि दायित्वे, कौटुंबिक जबाबदाऱ्या, जीवनशैली, आर्थिक उद्दिष्टे इत्यादींचे मूल्यांकन केल्यानंतरच टर्म इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करा.

टर्म इन्शुरन्स प्लॅन खरेदी करताना त्यातील अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचा. पॉलिसी अंतर्गत मृत्यूची कोणती कारणे समाविष्ट केली जातील, ते तपासा. कारण सर्व प्रकारचे मृत्यू टर्म इन्शुरन्समध्ये समाविष्ट नाहीत. जर पॉलिसीधारकाचा मृत्यू टर्म प्लॅन अंतर्गत अंतर्भूत कारणांमुळे झाला असेल तरच क्लेमचे पैसे मिळतात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com