आयफोनच्या ईएमआयने संपवली १० वर्षांची मैत्री! पनवेलमधील थरारक हत्येने महाराष्ट्र हादरला

Panvel murder news today : आयफोन खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते न भरल्याने मित्राला वारंवार फोन येत होते. याच कारणावरून झालेल्या वादातून पनवेलमध्ये तरुणाची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
 iPhone EMI Dispute
Friend Kills Man Over iPhone EMI Disputeसाम टीव्ही
Published On: 

विकास मिरगणे, नवी मुंबई प्रतिनिधी

पनवेल : आयफोनचे ईएमआयचे हप्ते भरण्यावरून झालेल्या वादातून एका मित्रानेच आपल्या मित्राची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुणाचे नाव प्रतीक अंबवले असे असून, तो ७ नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासात त्याचा मित्र प्रतीक जाधव यानेच हत्या केल्याचे उघड झाले असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर रोजी प्रतीक अंबवले आणि प्रतीक जाधव यांची पनवेल रेल्वे स्थानकावर भेट झाली. त्यानंतर दोघांनी शिवकर गावातील एका शाळेच्या पाठीमागे बसून दारू प्यायली. यावेळी आयफोनच्या ईएमआयवरून दोघांमध्ये वाद झाला. अंबवले याने आयफोन खरेदी करण्यासाठी जाधवच्या नावावर कर्ज घेतले होते; मात्र हप्त्याचे पैसे देणे बंद केल्याने कर्ज कंपनीकडून जाधवला वारंवार फोन येत होते. याच रागातून जाधवने चाकूने वार करून अंबवलेची हत्या केली. कोपरी पोलिसांच्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आला असून, पनवेल शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे…

 iPhone EMI Dispute
SBI ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! गुरूवारी ४५ मिनिटे बंद राहणार UPI सर्व्हिस; वाचा नेमकी वेळ आणि पर्याय

सहाय्यक पोलीस आयुक्त, मयूर भुजबळ काय म्हणाले?

ठाणे आयुक्तालयातील कोपरी पोलीस ठाण्यात ७ नोव्हेंबर रोजी 'प्रतीक आंबवले' (रा. कोपरी गाव) यांच्या मिसिंगबाबत (बेपत्ता असल्याबाबत) गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोपरी पोलिसांनी तपास केला असता, त्याचा मित्र प्रतीक जाधव याची चौकशी करण्यात आली. चौकशीत असे समोर आले की, ७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसात वाजता प्रतीक आंबवले कोपरीवरून पनवेल रेल्वे स्थानकावर आला होता.

दोन्ही मित्रांनी दारू विकत घेतली आणि शिवकर गावातील एका माध्यमिक शाळेच्या मागे बसून दारू प्यायले. मोबाईलचे हप्ते (EMI) न फेडल्यामुळे आणि त्यावरून सतत फोन करून त्रास दिल्यामुळे त्यांच्यात वाद झाला. खून: या वादासंदर्भातील रागातून प्रतीक जाधव याने चाकूने वार करून प्रतीक आंबवले याची हत्या केली. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. हे दोघे जण १०-१२ वर्षांपासून जुने मित्र होते. मयताने आयफोन घेतला होता आणि त्याचे हप्ते वेळेत न भरल्यामुळे त्यांच्यात हा वाद टोकाला गेला होता, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

 iPhone EMI Dispute
Dadar Railway Station : दादर रेल्वे स्थानकाचं नामकरण होणार, नवीन नावही ठरलं, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.